Kiran Rao : फिल्ममेकर किरण राव गेल्या काही दिवसांपासून तब्येतीच्या कारणामुळे चर्चेत होत्या. अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांना मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या असून डिस्चार्ज मिळताच त्यांनी इंस्टाग्रामवर काही खास फोटो शेअर करत आपल्या तब्येतीबद्दल माहिती दिली.
या फोटोसोबत एक असा तपशील उघड झाला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर नव्या चर्चांना उधाण आले आहे. किरण रावच्या हाताला बांधलेल्या हॉस्पिटल बँडवर त्यांचे नाव ‘किरण आमिर राव खान’ असे लिहिलेले दिसत आहे. त्यामुळे वेगळे होऊन तीन वर्षे झाली असली तरी त्या अजूनही आपल्या नावासोबत ‘आमिर’ हे आडनाव वापरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
किरण रावची भावनिक अपडेट (Kiran Rao)
किरण रावने हॉस्पिटलमधून शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्या हसतमुख दिसत आहेत. पोस्टमध्ये त्या म्हणतात, “मी तर 2026 मध्ये धमाल करण्याची तयारी केली होती. पण अपेंडिक्सने मला अचानक ब्रेक मारायला लावला. दीर्घ श्वास घे, सावकाश चाल आणि आभारी राह — असा जीवनाचा संदेशच मिळाला. आता मला डिस्चार्ज मिळाला आहे आणि मी घरी परत आले आहे. नव्या वर्षाची शांत, निवांत सुरुवात करणार आहे.” Kiran Rao
नावाबाबत जुने विधान पुन्हा चर्चेत
किरण राव आणि आमिर खान यांनी 2021 मध्ये परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. पण तरीही किरण आपले आडनाव बदलत नाहीत. नावासंबंधी त्यांचे 2011 मधील विधान आता पुन्हा चर्चेत येत आहे. त्यांनी त्यावेळी म्हटले होते—
“किरण राव खान हे नाव मला स्टायलिश वाटतं. लोक नावे कशी बदलतात हे मला कधीच समजलं नाही. मी जशी आहे तशी राहण्यात मला आनंद आहे. आणि आमिरही मला तसंच स्वीकारतात.”
15 वर्षांचा सहजीवन प्रवास
किरण राव आणि आमिर खान यांनी 2005 मध्ये लग्न केले आणि तब्बल 15 वर्षे एकत्र राहिल्यानंतर जुलै 2021 मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दोघेही मुलगा आजादच्या संगोपनात सहकार्य करीत आहेत. किरण रावपासून वेगळे झाल्यानंतर आमिर खान स्वतःच्या आयुष्यात पुढे गेले असून यंदाच्या सुरुवातीला त्यांनी गौरी स्प्रॅट यांच्यासोबतच्या नात्याची पुष्टी केली होती. हॉस्पिटलमधील एका छोट्या बँडमधून समोर आलेल्या नावाच्या या तपशीलामुळे किरण राव पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहेत.





