Tue, Dec 30, 2025

Politics News : उत्तर भारतीय महापौर बसवणार; भाजप नेत्याच्या विधानाने खळबळ

Published:
मीरा-भाईंदर मध्ये आम्ही इतके नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीय महापौर येथे बसेल असे विधान भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी केले. सिंह यांच्या या विधानाने भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Politics News : उत्तर भारतीय महापौर बसवणार; भाजप नेत्याच्या विधानाने खळबळ

Politics News : मुंबई महापालिकेत भाजपला उत्तर भारतीय महापौर बसवायचा आहे असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो. भाजपकडून हा आरोप सातत्याने खोडण्यात येत असला तरी आता मीरा-भाईंदर मध्ये भाजप नेत्याच्या एका विधानाने चांगलीच खळबळ उडाली आहे. मीरा-भाईंदर मध्ये आम्ही इतके नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीय महापौर येथे बसेल असे विधान भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी केले. सिंह यांच्या या विधानाने भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले कृपाशंकर सिंह (Politics News)

उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाकडून महापालिका क्षेत्रात उत्तर भारतीय संमेलन आयोजित करण्यात येत आहे. त्या मेळाव्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना कृपाशंकर सिंह म्हणाले,  निवडणुकीनंतर ही ९ वी सार्वजनिक निवडणूक आहे. लवकर महापालिका निवडणुका व्हाव्यात अशी जनतेची इच्छा होती. मीरा भाईंदर महापालिकेसह २९ महापालिकेत भाजपाच्या नेतृत्वात महायुतीची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  आम्ही इतके नगरसेवक निवडून आणू ज्यातून उत्तर भारतीय महापौर बसेल. Politics News

भाजपची खास रणनीती

दरम्यान, महापालिका निवडणुकीत गेम चेंजर ठरणाऱ्या उत्तर भारतीय मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने खास रणनीती आखली आहे. भाजपकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बिहारच्या आमदार मैथिली ठाकूर यांसह मुंबई आणि आसपासच्या परिसरात प्रचारासाठी उतरवण्यात येणार आहे. या संपूर्ण महापालिका पट्ट्यात या नेत्यांच्या सभा लावण्यात येतील.  त्याशिवाय भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाकडून महापालिका क्षेत्रात उत्तर भारतीय संमेलन आयोजित करण्यात येत आहे. एकूणच काहीतरी मुंबई सह आसपासच्या महापालिका निवडणुकीतही भाजपाने संपूर्ण जोर लावल्याचे दिसून येते.