Politics News : शरद पवार 2022 मध्येच NDA मध्ये येणार होते; संजय शिरसाट यांचा दावा

Published:
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय शिरसाट यांनी दावा केला की, शरद पवार यांच्या एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या हालचाली या नव्या नाहीत, तर २०२२ पासूनच त्याबाबत चर्चा सुरू होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या काळात संभाव्य खातेवाटप, कोणती मंत्रालये घ्यायची किंवा टाळायची याबाबतही अनौपचारिक स्तरावर चर्चा झाली होती
Politics News : शरद पवार 2022 मध्येच NDA मध्ये येणार होते; संजय शिरसाट यांचा दावा

Politics News : अजित पवारांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेला वेग आला असतानाच आता शरद पवारांबाबत एक नवा आणि खळबळजनक दावा समोर आला आहे. शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी शरद पवारांनी २०२२ मध्येच एनडीएमध्ये जाण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या, असा गंभीर आरोप केला आहे.

काय म्हणाले संजय शिरसाट (Politics News)

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय शिरसाट यांनी दावा केला की, शरद पवार यांच्या एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या हालचाली या नव्या नाहीत, तर २०२२ पासूनच त्याबाबत चर्चा सुरू होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या काळात संभाव्य खातेवाटप, कोणती मंत्रालये घ्यायची किंवा टाळायची याबाबतही अनौपचारिक स्तरावर चर्चा झाली होती. मात्र, नंतरच्या काळात नेमक्या कोणत्या पातळीवर संवाद झाला, याबाबत शरद पवार यांनीच स्पष्ट बोलणे आवश्यक असल्याचेही शिरसाट यांनी नमूद केले. Politics News

राष्ट्रवादीकडून पलटवार

या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून तात्काळ प्रतिक्रिया देण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शिरसाट यांच्या दाव्याला चोख प्रत्युत्तर दिले.  संजय शिरसाट यांना २०२२ मधील गोष्टींची आठवण अचानक २०२६ मध्ये का झाली? जर इतकी माहिती होती, तर त्यावेळीच का बोलले नाहीत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, जर शरद पवारांना खरोखर एनडीएमध्ये जायचे असते, तर पक्षफुट झालीच नसती, असे म्हणत त्यांनी हा दावा केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी केल्याचा आरोप केला.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews