Marathi News

Parth Pawar : पार्थ पवार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष? शरद पवारही आग्रही असल्याची चर्चा

Published:
राष्ट्रवादीच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर येते सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खरंतर अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे
Parth Pawar : पार्थ पवार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष? शरद पवारही आग्रही असल्याची चर्चा

Parth Pawar : राष्ट्रवादीच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर येते सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खरंतर अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे यामध्ये आता पार्थ पवार यांचे नाव आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतः शरद पवार हे पार्थ यांच्या नावासाठी आग्रही असल्याचे बोलले जातय.

पार्थ यांचे नाव कसे समोर आलं (Parth Pawar)

मागील सात ते आठ दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या चर्चा आहेत. सुरुवातीला यामध्ये सुनेत्रा पवार आणि त्यानंतर प्रफुल पटेल यांचे नाव घेतलं जात होतं मात्र राज ठाकरेंच्या त्या टीकेनंतर प्रफुल पटेल यांचे नाव आपोआप मागे पडलं. अशावेळी सुनेत्रा पवार याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा होतील असं बोललं जात होतं . मात्र आता यामध्ये पार्थ पवार यांचे नाव आघाडीवर दिसते. Parth Pawar

शरद पवार स्वतः आग्रही

दोन दिवसांपूर्वीच पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या तब्बल पावणे दोन तास चर्चा झाली होती यावेळी शरद पवार यांनी पार्थ पवार यांना विद्या प्रतिष्ठान मधील कामकाज, यासह इतर गोष्टी अतिशय बारकाईने सांगितल्या. त्यामुळे पार्थ पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या चर्चांना बळ मिळत नाही.

पार्थ पवार याचं नाव सर्वात आधी राज्यकारणात समारं होते 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ….त्यावेळी मावळ मधून ते उभे राहिले होते मात्र त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतरही युवकांशी संबंधित विषय, रोजगार, उद्योग आणि विकास या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने भाष्य केलं.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews