Marathi News

सुनील तटकरे विश्वासघातकी, दादांच्या निधनानंतर त्याने गलिच्छ राजकारण केलं

Published:
अजित पवार यांच्या चितेची आग विझण्याआधी सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला भाग पाडलं. हिंदू संस्कृतीनुसार कमीत कमी दहा दिवस दुःखाचे पाळावे लागतात, त्यानंतर शपथविधी झाला असता तर काय बिघडलं असते का असा सवाल रामदास कदम यांनी केला
सुनील तटकरे विश्वासघातकी, दादांच्या निधनानंतर त्याने गलिच्छ राजकारण केलं

राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या घडामोडींना वेग आल्याचे चित्र दिसत आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चर्चांनंतर विविध स्तरांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अपघात की घातपात, याबाबत अधिकृत चौकशीची मागणी काही नेत्यांकडून केली जात आहे. याच दरम्यान, उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीवरूनही राजकीय वाद निर्माण झाला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा घाईघाईत शपथविधी घेण्यात आल्यानंतरविरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. उपमुख्यमंत्री पद हे संविधानिकदृष्ट्या बंधनकारक नसताना शपथविधीची घाई का करण्यात आली, असा सवालही राजकीय चर्चेत पुढे येतो आहे. याच दरम्यान आता शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्या वर गंभीर टीका केली आहे.

काय म्हणाले रामदास कदम?

अजित पवार यांच्या चितेची आग विझण्याआधी सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला भाग पाडलं. हिंदू संस्कृतीनुसार कमीत कमी दहा दिवस दुःखाचे पाळावे लागतात, त्यानंतर शपथविधी झाला असता तर काय बिघडलं असते का असा सवाल रामदास कदम यांनी केला. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा घेतील या भीतीमुळे तटकरेंनी ही ‘चालाख खेळी केली आणि सुनेत्रा वहिनींना शपथ घ्यायला भाग पाडले असा आरोप रामदास कदम यांनी केला.  ज्या माउलीचे कुंकू आणि मंगळसूत्र गेले, त्यांना सुतकही पाळू न देता मुंबईला आणून शपथविधी करायला लावणाऱ्या सुनील तटकरेंना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही, अस म्हणत रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

तटकरेंनी अजितदादाना संपवले?

सुनील तटकरे यांनीच अजितदादांना संपवलं, असा आरोप विरोधक करत आहेत याबाबत विचारला असतं रामदास कदम यांनीही तशाच प्रकारचे विधान केलं. सुनील तटकरे काहीही करू शकतात. “ज्यांनी त्यांना मोठं केले, त्यांनाच संपवण्याचं काम ते करतात. माझ्या मुलाला राजकारणात संपवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार?” असं म्हणत रामदास कदम यांनी खळबळ उडवून दिली. आता रामदास कदम यांच्या या आरोपांना स्वतः सुनील तटकरे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते काय उत्तर देतात ते पाहायला हवं.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews