Wed, Dec 31, 2025

Happy New Year 2026 Wishes : प्रियजनांना पाठवा नववर्षाच्या ‘या’ खास शुभेच्छा.! नवीन वर्षाची सुरुवात होईल खास

Published:
नववर्ष 2026 निमित्त जर तुम्हाला नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शुभेच्छा पाठवायच्या असतील, तर तुम्ही 'हे' शुभेच्छा संदेश पाठवू शकता..
Happy New Year 2026 Wishes : प्रियजनांना पाठवा नववर्षाच्या ‘या’ खास शुभेच्छा.! नवीन वर्षाची सुरुवात होईल खास

आता फक्त काहीच दिवस उरलेत. 31 डिसेंबरच्या रात्री आपण सरत्या वर्षाला निरोप देणार आहोत. त्यानंतर आपण नव्या वर्षात पदार्पण करू. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी अवघं जग आतूर झालं आहे.  नवीन वर्ष सगळ्यांसाठीच खूप महत्वाचं असतं. मागच्या वर्षात राहिलेली स्वप्न पुढच्या वर्षी पूर्ण करूया असं म्हणत काही लोक नव्याने सुरुवात करतात. हे वर्ष जास्तीत जास्त आनंदाने, प्रियजनांच्या सहसावात, प्रगती आणि भरभराटीने जावे अशी सर्वांची इच्छा असते. येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुमच्या सर्व नातेवाईक, मित्रांना खास शुभेच्छा संदेश पाठवा…

नवीन वर्षाच्या शुभेच्छा..

नवीन वर्षात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत
आयुष्यात तुम्ही सुखी व आनंदी राहो हीच सदिच्छा
नवीन वर्षाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

येणारे वर्ष तुमच्यासाठी लकी ठरो
कुटुंबात तुमच्या भरभराट होवो
चेहऱ्यावर कायम हसू उमटो
संपूर्ण वर्ष तुमचे सुखात जावो
हॅपी न्यू ईयर…!

वर्षातील 365 दिवस
तुमच्या आयुष्यात शुभता
घेऊन येवो,प्रत्येक क्षण
तुमच्यासाठी आनंदाचा ठरो
हॅपी न्यू ईयर..!

नवीन वर्षाची सकाळ
आयुष्य तुमचं तेजोमय करो
सोनेरी क्षण तुमचे जीवन
प्रकाशमय करोत
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

आगामी वर्ष तुमच्या आयुष्यात
आनंद सुख समृद्धी घेऊन येईल
प्रगतीचे दरवाजे खुले होतील
नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

पुन्हा एक नवीन वर्ष,
पुन्हा एक नवी आशा
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितिजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा..
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

प्रत्येक आनंद प्रत्येक पावलावर तुला मिळो
जगातील प्रत्येक यश तुझ्याकडे येवो,
या नव्या वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा…

नववर्षाची सकाळ होताच तुमचं आयुष्यही व्हावं प्रकाशमय ही प्रार्थना करू,
नववर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप चांगलं जावो या हार्दिक शुभेच्छा..!

जुनं वर्ष होत आहे सगळ्यांपासून दूर,
यश आणि आनंद सगळ्यांना मिळो भरपूर,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

माझी इच्छा आहे की येणारे 12 महिने सुख मिळो
52 आठवडे यश आणि 365 दिवस मजेदार जावोत
माझ्या मित्र-मैत्रिणींना, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

येणारं हे नववर्ष तुम्हा सगळ्यांना चांगले जावो,
ईश्वराची कृपा तुमच्यावर राहो.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

नवं वर्ष, नवी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी वाट.
हास्य, आनंद लाभो सदा,
यश असो कायम सोबत.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभच्छा!

नव्या पहाटेचा नवा किरण,
देई आशेचं सुंदर दर्शन.
नवं वर्ष घेऊन येवो,
सुख-समाधानाचं वचन.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभच्छा!
नव्या वर्षात नवी उमेद,
नव्या वाटेवर नवा वेग.
दुःख विसरूया हसत सदा,
आनंद असो प्रत्येक पायरीवर.
हॅपी न्यू ईयर…!