Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. नवीन वर्ष सुरू होण्याच्या पूर्वसंध्येलाच राज्य सरकारकडून लाडक्या बहिणीच्या खात्यावर दीड हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. खरंतर मागील दोन महिन्यापासून लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा न झाल्याने महिलांच्या मनामध्ये धाकधुक निर्माण झाली होती. मात्र आता १५०० रुपये मिळाल्याने लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.
लाडक्या बहिणी खुश (Ladki Bahin Yojana)
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका पार पडल्या. तर आता महापालिका निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपल्या आहेतं. आचारसंहिता चालू असताना लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे येतील की नाहीत याबाबत शंका होती. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ३ महिन्यांचे एकदम ४५०० रुपये निवडणुकीनंतर जमा होतील अशा चर्चाही मीडिया मध्ये रंगल्या होत्या. मात्र आता प्रत्यक्षात नवीन वर्ष सुरू होण्याच्या आदल्या दिवशीच लाडक्या बहिणीच्या खात्यात १५०० रुपये तरी जमा झाले आहेत. त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे. Ladki Bahin Yojana
इ केवायसी अनिवार्य
दरम्यान, लाडकी बहीण योजने बाबत सरकारने आता लाभार्थ्यांची छाननी अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ३१ डिसेंबर पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया सक्तीची करण्यात आली होती. आज ही तारीख उलटून गेली, मात्र सरकारकडून पी केवायसी साठी यावेळी निरतवार देण्यात आलेली नाही. त्यामुळे ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेतून वगळले जाण्याची शक्यता असून, अंदाजे ५० ते ६० लाख महिलांचे अर्ज बाद होऊ शकतात, अशी चर्चा आहे.





