पाणीकपातीमुळे नागरिकांची डोकेदुखी नेहमीच वाढत असते. अशा परिस्थितीत ठाणेकरांसाठी डोकेदुखी वाढवणारी अशी एक बातमी समोर आली आहे. कारण, ठाणे शहर आणि परिसरात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद असणार आहे. नेमका शहरातील कोणत्या भागातील पाणीपुरवठा प्रभावित होईल ते जाणून घेऊ…
शुक्रवारी ठाण्यात पाणी नाही!
समोर येणाऱ्या माहितीनुसार ठाणे महापालिकेच्या घोडबंदर परिसरात पाणी पुरवठा करणारी हरिदास नगर येथील मुख्य जलवाहिनी वरील 700 मि.मी व्यासाची झडप नादुरूस्त झाली आहे. परिणामी या परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून सदर वॉल्व बसविणे अत्यावश्यक असून नवीन वॉल्व बसविणेसाठी शुक्रवार दिनांक 02/01/2026 रोजी सकाळी 9.00 ते 9.00 पर्यंत ठाणे महानगरपालिका व स्टेम प्राधिकरणाकडून होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचा शटडाऊन घेण्यात येणार आहे.
कोणत्या भागात पाणीपुरवठा प्रभावित ?
परिणामी, दिनांक शुक्रवार दिनांक 02/01/2026 रोजी सकाळी 9.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यत घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतूपार्क, जेल, गांधीनगर, सिध्दांचल, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिध्देश्वर, इटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा व कळव्याचा काही भागात 12 तासांसाठी पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणी कपातीच्या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.





