Sara Tendulkar Beer Bottle : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सारा सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्ह असते. साराची सुंदरता आणि फिटनेस यामुळे तिचा चाहता वर्गही संपूर्ण देशात मोठा आहे. मात्र आज 31 डिसेंबर म्हणजे थर्टी फर्स्ट च्या दिवशीच सारा तेंडुलकर एका व्हिडिओमुळे अडचणीत आली आहे. वायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये साराच्या हातात दारूची बाटली असल्याचे दिसत आहे.
नेमकं काय आहे व्हिडिओत? Sara Tendulkar Beer Bottle
सध्या सर्वत्र ३१ डिसेंबरच्या पार्टीचा माहोल बघायला मिळतोय. 31 डिसेंबरच्या निमित्ताने अनेक जण गोव्याला जातात आणि मनसोक्त पार्ट्या करत असतात. सारा ही गोव्याला गेल्याचे या व्हिडिओ दिसते. वायरल व्हिडिओमध्ये सारा तिच्या मित्रांसोबत गोव्याच्या रस्त्यांवर सुट्टी घालवताना दिसत आहे, पण तिच्या हातात असलेल्या दारूच्या बाटलीमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं.
Sachin Tendulkar : I will never promote alcohol and tobacco.
Le his daughter Sara on streets of Goa with 🥲:https://t.co/zkDbfPHhsT
— Ctrl C Ctrl Memes (@Ctrlmemes_) December 31, 2025
या व्हायरल व्हिडिओमध्ये सारा तेंडुलकर तीन मैत्रिणींसोबत गोव्याच्या रस्त्यांवर कॅज्युअल फेरफटका मारताना दिसत आहे. सारा बिअरची बाटली हातात धरून दिसत आहे. इंस्टाग्राम आणि ट्विटरवर व्हिडिओ येताच लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. Sara Tendulkar Beer Bottle
ट्रोलर्स आणि चाहत्यांमध्ये 2 मते
व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर दुफळी माजली आहे. काही वापरकर्ते साराला ट्रोल करत आहेत, एकाने म्हटलं, तिला अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी दिसायला नको होते. तर काही जण याचा संबंध सचिन तेंडुलकरच्या कौटुंबिक मूल्यांशी जोडत आहेत.
तर दुसरीकडे, साराचे चाहते तिच्या बचावात ठामपणे उभे आहेत. समर्थकांच्या सारा एक प्रौढ आहे आणि तिला तिचे खाजगी जीवन तिच्या मनाप्रमाणे जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. चाहत्यांचे म्हणणे आहे की सुट्टीत बिअर पिणे हा गुन्हा नाही.





