Sanjay Raut : एकीकडे सर्वत्र महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना मुंबईत खळबळ जनक घटना समोर येते. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि फायर ब्रँड नेते संजय राऊत यांच्या घरी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक दाखल झालं आहे. मुंबई पोलिसांचं एक पथक देखील संजय राऊत यांच्या घरी दाखल झालं आहे. ठाकरे गट आणि मनसेत युती घडवून आणण्यात संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आजही ठाकरेंची बाजू भक्कमपणे मांडणारा एक मजबूत नेता म्हणून राऊतांकडे बघितले जाते. अशावेळी अचानक पणे बॉम्बशोधक पथक त्यांच्या घरी दाखल झाल्याने शिवसैनिक काळजीत पडलेत.
नेमकं काय आहे प्रकरण (Sanjay Raut)
संजय राऊत हे भांडुप मध्ये राहतात. आज त्यांच्या घरापसमोर ‘बॉम्ब से उडा दुंगा’ असे स्टिकर लावलेली गाडी आढळून आली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर यंत्रणा सतर्क झाल्या. संजय राऊतांच्या घरी बॉम्बशोधक पथक दाखल झाले आहे. संपूर्ण घर, आणि घराबाहेरचा आसपासच्या परिसराची तपासणी केली जात आहे. हे स्टिकर नेमके कोणी चिटकवले हे अजून समोर आलेले नाही. परंतु खबरदारी म्हणून राऊतांच्या घराची तसेच आसपासच्या परिसराची तपासणी केली जात आहे. या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीसही सतर्क झाले. पोलिसांनी तातडीने संजय राऊत यांच्या घराच्या दिशेला धाव घेतली. Sanjay Raut
संजय राऊत ठाकरेंचा खराखुरा आवाज
दरम्यान संजय राऊत म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेची धडाडीची तोफ आहे .उद्धव ठाकरेंचा खराखुरा आवाज आहे. शिवसेना काय करणार यापेक्षा शिवसेना काय करू शकते ही जी शक्यता आहे या शक्यतेचे नाव म्हणजे संजय राऊत. .. आज एकीकडे गंभीर आजार असतानाही संजय राऊत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दररोज सकाळ सकाळच्या पत्रकार परिषद घेत आहेत. विरोधकांवर टीकेचा भडीमार करतायेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांना एकत्र आणण्यात सुद्धा संजय राऊतांचं सिंहाचा वाटा असल्याचे बोलले जाते. मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी महापौरच बसणार हे आजही ते विरोधकांना ठासून सांगत आहेत.





