एटीएसचे भिवंडीत मोठे सर्च ऑपरेशन सुरू; नेमकं घडतंय काय?

Written by:Rohit Shinde
Published:
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशांतर्गत सुरक्षेला देखील मोठं महत्व दिलं जात आहे. आता भिवंडीमध्ये एटीएसकडून मोठं सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.
एटीएसचे भिवंडीत मोठे सर्च ऑपरेशन सुरू; नेमकं घडतंय काय?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकवर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मोठी कारवाई केली. एअर स्ट्राईक केले. परंतु त्यानंतर देशांतर्गत सुरक्षेला देखील तेवढचं महत्व दिलं जात असल्याची बाब समोर आली आहे.  छत्तीसगड सारख्या भागात नक्षल्यांवर मोठी कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता महाराष्ट्र, गुजरातमध्ये सातत्याने कारवाई सुरू आहे. आता एटीएस अर्थात दहशतवादी विरोधी पथकाने भिवंडीत मोठी कारवाई सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये मोठी शोध मोहिम या भागात राबवली जात असल्याची माहिती आहे.

भिवंडीत एटीएसची शोध मोहीम

भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या बोरिवली गावात आज सकाळी एटीएसने मोठे सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. या ऑपरेशनमुळे संपूर्ण गावात पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यामुळे गावाला छावणीचं स्वरूप आलं आहे. अनेक संशयास्पद व्यक्तींच्या घरी एटीएसची सकाळपासूनच छापेमारी सुरू आहे. बोरिवली गाव हे साकिब नाचण आणि इतर दहशतवाद्यांचा तळ म्हणून ओळखलं जातं.

भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या बोरिवली गावात आज सकाळी एटीएसने मोठे सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. या ऑपरेशनमुळे संपूर्ण गावात पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यामुळे गावाला छावणीचं स्वरूप आलं आहे. अनेक संशयास्पद व्यक्तींच्या घरी एटीएसची सकाळपासूनच छापेमारी सुरू आहे.

भिवंडीत घेतात गन्हेगार, दहशतवादी आसरा

बोरिवली गाव हे साकिब नाचण आणि इतर दहशतवाद्यांचा तळ म्हणून ओळखलं जातं. यापूर्वीही या गावातून अनेकदा दहशतवाद संबंधित कारवाईंमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं आहे. याच गावातून कुख्यात साकिब नाचण, त्याचा मुलगा आणि इसिसमधील दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या १६ जणांना अटक करण्यात आली होती. तसेच पुणे येथील एका प्रकरणात चार जणांना येथूनच ताब्यात घेण्यात आलं होतं.

सध्या या ऑपरेशनमध्ये किती जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. एटीएस अधिकारी याबद्दलची माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. सध्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे. दहशतवादी तसेच अनेक गुन्हेगार अनेकदा भिवंडीत आसरा घेतात, या ठिकाणी कट रचले जातात त्यामुळे एटीएसच्या या कारवाईला यामुळे मोठं महत्व आलं आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews