कर्नाटकातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. कर्नाटकचे डीजीपी रँकचे अधिकारी आयजीपी रामचंद्र राव यांचा त्यांचा कार्यालयात महिलांशी अश्लील वर्तनाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे संतापाची लाट उसळली आहे. व्हायरल दृश्य पाहून कुणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. पोलिसांच्या गणवेशात बसलेले कर्नाटकातील पोलीस महासंचालक रँकचे अधिकारी आयजीपी रामचंद्र राव त्यांच्या कार्यालयात गणवेश परिधान करून महिलांशी अश्लील वर्तन करतानाचे व्हिडीओ समोर आलेत. नहे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, कर्नाटकातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दुर्दैवानं कायद्याचं रक्षण करणाऱ्या डीजीपी कार्यालयातच हा सगळा प्रकार सुरु होता.
डॉ. रामचंद्र राव यांनी कार्यालयात कर्तव्यावर असताना महिलांशी अश्लील संबंध ठेवल्याचा आरोप आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही या प्रकरणाची दखल घेत चौकषीचे आदेश दिलेत. या व्हिडीओंमुळे रामचंद्र राव नुसतेच चर्चेत आलेले नाहीत तर त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरतेय.
कोण आहेत रामचंद्र राव?
१. के. रामचंद्र राव हे 1993 च्या बॅचचे कर्नाटक केडरचे आयपीएस अधिकारी आहेत
२. २०१४ साली म्हैसूर बस दरोडा प्रकरणात आयजीपी रामचंद्र राव यांच्यावर गंभीर आरोप
३. केरळच्या एका ज्वेलर्सची बस अडवून 2.26 कोटी रुपये लुटल्याचा आरोप
4. त्यानंतर राव यांच्यावर निलंबनाची कारवाई
5. 2023 साली कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण निगममध्ये पोलीस महासंचालक म्हणून पदोन्नती
6. सोने तस्करी प्रकरणात अडकलेल्या अभिनेत्री रान्या रावचे सावत्र वडील आहेत
7. रान्या राव प्रकरणात राव यांना अनिवार्य रजेवर पाठवण्यात आले
8. त्यानंतर नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाच्या पोलीस महासंचालकपदी
मुलीलाही केलं होतं अटक…
मुलगी रान्या राव प्रकरणानंतर कार्यालयात महिलांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत असल्याच्या व्हिडिओनं रामचंद्र राव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यापूर्वी १५ किलो सोन्याच्या तस्करी करताना राव यांची मुलगी आणि अभिनेत्री रान्या रावला अटक करण्यात आली होती. सलग चार वेळा दुबईला जाऊन आल्यानं तिच्यावर संशय होता. त्यानंतर बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने तिला अटक केली होती. तिच्या अटकेमुळे प्रशासकीय आणि चित्रपट वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. आता महिलांशी अश्लील वर्तनाचे रामचंद्र राव यांचे व्हिडीओ समोर आलेत. आता यावेळी त्यांच्यावर काय कारवाई होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल





