A R Rahman : छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असलेला छावा चित्रपट 2025 या वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. विकी कौशल्याने या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अतिशय उत्तमरीत्या साकारली आणि जनतेच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. मात्र आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही महिन्यांनी, चित्रपटाचे संगीत आणि पार्श्वसंगीत सांभाळणारे संगीतकार ए.आर. रहमान यांनी छावा चित्रपटाबद्दल वादग्रस्त विधान करत नव्या वादाला तोंड फोडल आहे.
ए.आर. रहमान काय म्हणाले (A R Rahman)
बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत, ए.आर. रहमान यांना विचारण्यात आले की छावा हा फूट पाडणारा चित्रपट आहे का. यावर ए.आर. रहमान यांनी उत्तर दिले, “हो, ‘छावा’ हा फूट पाडणारा चित्रपट आहे.” मला वाटतं की त्यांनी फाळणीचा फायदा घेतला, पण त्यांचा उद्देश शौर्य दाखवणे आहे. त्यांचा क्लायमॅक्स पाहण्यासारखा आहे. या सगळ्यात लोक बुद्धिमान आहेत. तुम्हाला वाटतं का ते चित्रपटांनी प्रभावित होतील? लोकांना सत्य काय आणि कपटी काय आहे हे माहिती असते. छावा’ हा एक अत्यंत प्रसिद्ध चित्रपट आहे आणि मला त्याचे संगीतबद्ध केल्याचा अभिमान आहे. कारण तो प्रत्येक मराठ्याच्या हृदयाचे ठोके आणि आत्मा आहे. काही चित्रपट दुर्भावनापूर्ण हेतूने बनवले जातात आणि मी त्यांच्यापासून दूर राहू इच्छितो. A R Rahman
बॉलिवूडमध्ये काम मिळत नाही – रहमान
अलीकडेच, ए.आर. रहमान यांनी असेही म्हटले आहे की बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या राजकारणामुळे त्यांना गेल्या आठ वर्षांपासून काम मिळत नाही. ए.आर. रहमान यांचा जन्म १९६७ मध्ये मद्रास येथे दिलीप कुमार राजगोपाल यांच्या नावाने झाला. २२ वर्षांनंतर, १९८९ मध्ये त्यांनी धर्म बदलला आणि इस्लाम धर्म स्वीकारला होता.






