ऐश्वर्या–अभिषेक केदारनाथच्या दर्शनाला? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 4 फोटोंची खरी गोष्ट समोर

Published:
सोशल मीडियावर झपाट्याने पसरलेल्या या फोटोंमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र पोज देताना दिसत आहेत.
ऐश्वर्या–अभिषेक केदारनाथच्या दर्शनाला? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 4 फोटोंची खरी गोष्ट समोर

बॉलिवूडचे लोकप्रिय स्टार कपल ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या फोटोंना चाहत्यांकडून नेहमीच भरभरून प्रतिसाद मिळतो. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालीवर सोशल मीडियाची नजर असते. नुकतेच या जोडीचे चार फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून त्यात दोघेही केदारनाथात दर्शनासाठी गेले असल्याचा दावा करण्यात आला.

सोशल मीडियावर झपाट्याने पसरलेल्या या फोटोंमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र पोज देताना दिसत आहेत. पार्श्वभूमीला केदारनाथ धाम स्पष्ट दिसत असल्याने अनेकांनी हे फोटो खरे मानून त्यांचे उत्तराखंड दौऱ्याबद्दल अभिनंदनही केले.

AI वर बनवले फोटो

मात्र या फोटोंची सत्यता पूर्णपणे वेगळी आहे. हे सर्व फोटो प्रत्यक्षात एआयच्या मदतीने तयार केलेले असून वास्तवाशी त्यांचा काही संबंध नाही. सेलिब्रिटींच्या अशा एआय-निर्मित फोटोंचा पूर गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर दिसत आहे आणि ऐश्वर्या–अभिषेक हे नवीन बळी ठरले.

ऐश्वर्या नेहमी सतर्क असते

ऐश्वर्या राय बच्चन स्वतः अशा फेक कंटेंटबाबत अत्यंत जागरूक आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अधिकार आणि गोपनीयतेचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने त्यांना दिलासा देत मोठा निर्णय दिला.

न्यायालयाने आदेश दिला की त्यांच्या परवानगीशिवाय  त्यांची प्रतिमा, आवाज, फोटो किंवा इतर कोणताही वैयक्तिक कंटेंट वापरणे हे त्यांच्यावरील ‘गरिमेने जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन’ आहे. त्यामुळे अशा बनावट किंवा अनधिकृत पोस्टचे लिंक 72 तासांच्या आत हटविणे, ब्लॉक करणे किंवा निष्क्रिय करण्याचे निर्देश संबंधित प्लॅटफॉर्मना देण्यात आले.

केदारनाथातील व्हायरल फोटो हा देखील त्याच प्रकारातील एक भाग असून चाहत्यांना आता या एआय फोटोंमागील सत्य समजले आहे. सोशल मीडियावर पसरत असलेल्या अशा भ्रामक कंटेंटविरोधात सेलिब्रिटी दिवसेंदिवस अधिक जागरूक होत असल्याचेही या प्रकरणातून स्पष्ट होते.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews