Tue, Dec 30, 2025

Arshad Warsi On Akshay Khanna : तो कोणाबद्दल विचार करत नाही…अक्षय खन्ना बाबत अर्षद वरसीचे वक्तव्य चर्चेत

Published:
एका दिलखुलास मुलाखतीत अरशद वारसींना अक्षय खन्नाच्या गाजलेल्या भूमिकेबद्दल आणि त्यांच्या स्वभावाबद्दल विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की अक्षय खूपच सीरियस आणि उत्तम अभिनेता आहे. तो नेहमीच आपल्या कामात गुंतलेला असतो आणि त्याची स्वतंत्र दुनिया आहे
Arshad Warsi On Akshay Khanna : तो कोणाबद्दल विचार करत नाही…अक्षय खन्ना बाबत अर्षद वरसीचे वक्तव्य चर्चेत

Arshad Warsi On Akshay Khanna : रणवीर सिंहची ब्लॉकबस्टर फिल्म धुरंधर बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. तब्बल 1,000 कोटींचा टप्पा पार करत भारतातील नववी आणि बॉलिवूडमधील चौथी 1,000 कोटींची फिल्म बनलेली ही सुपरहिट प्रेक्षकांच्या चर्चेत कायम आहे. या चित्रपटात रणवीरसोबत अक्षय खन्नाने साकारलेला रहमान डकैतचा रोल विशेष उठून दिसत आहे. त्यांच्या अभिनयाची केवळ प्रेक्षकांनीच नव्हे, तर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही भरभरून प्रशंसा केली आहे.

अमीषा पटेल, तारा शर्मा, आर. माधवन यांसारख्या कलाकारांनी अक्षयच्या परफॉर्मन्सचे कौतुक केलेच, पण आता त्यांचे सहकलाकार अरशद वारसी यांनी अक्षयच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा खुलासा करत चर्चेला नवा रंग दिला आहे.

अक्षय खूपच सीरियस आणि उत्तम अभिनेता (Arshad Warsi On Akshay Khanna)

एका दिलखुलास मुलाखतीत अरशद वारसींना अक्षय खन्नाच्या गाजलेल्या भूमिकेबद्दल आणि त्यांच्या स्वभावाबद्दल विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की अक्षय खूपच सीरियस आणि उत्तम अभिनेता आहे. तो नेहमीच आपल्या कामात गुंतलेला असतो आणि त्याची स्वतंत्र दुनिया आहे. अरशद म्हणाले, “अक्षयला कुणाबद्दल काय वाटतं याचं काहीच पडत नाही. तो कोणाबद्दल विचार करत नाही. तुम्ही त्याच्याबद्दल काय मत बनवता, हा तुमचा प्रश्न आहे, त्याचा नाही.”

अरशद यांनी असेही सांगितले की अक्षय खन्ना पीआर आणि इमेज बिल्डिंगमध्ये जास्त रस घेत नाही. “तो आपली लाइफ स्वतःच्या नियमांवर जगतो. सुरुवातीपासूनच तो असा आहे आणि आजही त्याची हीच स्टाईल आहे,” असे ते म्हणाले. Arshad Warsi On Akshay Khanna

2009 मध्ये दोघांचं एकत्र काम

अक्षय आणि अरशद यांनी 2009 मध्ये आलेल्या शॉर्टकट: द कॉन इज ऑन या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्या काळातही अक्षयचा स्वभाव तसाच शांत, स्वतःपुरता राहणारा आणि आपल्या तत्त्वांवर ठाम असा असल्याचे अरशद यांनी सांगितले. धुरंधरच्या अफाट यशामुळे अक्षय खन्ना पुन्हा एकदा इंडस्ट्रीत चर्चेचा विषय बनला आहे. त्यांचा अभिनय जसा प्रभावी आहे, तशीच त्यांची लो-प्रोफाइल, स्वतःच्या नियमांवर चालणारी लाइफस्टाईलही नेहमीच चर्चेत राहते.