Bollywood News : टी-सीरिजचे प्रमुख भूषण कुमार आणि अभिनेत्री-डान्सर नोरा फतेही यांचे नाव पुन्हा एकदा सोशल मीडियावर जोडले जात आहे. पाच वर्षांपूर्वी रेडिटवर पोस्ट करण्यात आलेली एक चर्चा टिकटॉकवर पुन्हा व्हायरल झाली आणि त्यातून या दोघांच्या कथित संबंधांबाबतच्या अफवा नव्या जोमानं पसरू लागल्या. त्या जुन्या पोस्टमध्ये नोराची लक्झरी लाइफस्टाइल महागडे बॅग, स्टायलिश कपडे, उंची कार आणि तिचा ग्लॅमरस जीवनशैली — याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. कोणताही प्रामाणिक पुरावा नसताना काही यूजर्सनी अंदाज बांधत नोराचे एखाद्या मोठ्या इंडस्ट्री व्यक्तीसोबत संबंध असू शकतात असा दावा केला आणि त्यात भूषण कुमार यांचं नाव घेण्यात आलं.
एका शब्दांने रंगल्या चर्चा (Bollywood News)
हीच पोस्ट टिकटॉकवर व्हिडिओच्या रूपात पुन्हा समोर आली आणि चर्चा चांगलीच रंगली. या व्हिडिओवर आलेल्या कमेंट्समध्ये स्वतः नोरा फतेहीने प्रवेश करत प्रतिक्रिया दिली. नोराने संपूर्ण प्रकरणाला विनोदी शैलीत घेत अत्यंत छोटा आणि हलकाफुलका कमेंट केला. तिच्या या एका शब्दातील प्रतिक्रियेने सोशल मीडियावर नवे वादंग सुरू झाले. काही यूजर्सचे म्हणणे होते की नोराने प्रतिक्रिया देऊ नये, कारण अशा प्रतिक्रियांमुळे अफवांना आणखी खतपाणी मिळते. तर अनेकांनी तिचे समर्थन करत बिनबुडाच्या चर्चांमुळे कलाकारांची प्रतिमा खराब होते, असे स्पष्ट मत व्यक्त केले. लोकांनी हेही नमूद केले की रेडिट, टिकटॉकवर निर्माण होणाऱ्या अशा कथांना अनेकदा सत्य मानणारी मानसिकता वाढत असल्याने कलाकारांना विनाकारण बदनाम व्हावे लागते. Bollywood News
या व्यक्तीशीही जोडलं जातंय नाव
दरम्यान, नोराचे नाव आणखी एका नवीन अफवेशी जोडले जात आहे. मोरक्कोचा फुटबॉलपटू अक्राफ हकीमी याच्या एका सोशल मीडिया पोस्टला नोराने लाइक दिल्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या चर्चा काही प्लॅटफॉर्मवर सुरू झाल्या आहेत. मात्र या विषयी नोराकडून किंवा तिच्या टीमकडून कोणताही अधिकृत प्रतिसाद आलेला नाही.
दुसरीकडे, भूषण कुमार यांनी वर्ष 2005 मध्ये अभिनेत्री आणि दिग्दर्शक दिव्या खोसला यांच्याशी विवाह केला असून त्यांना 2011 मध्ये मुलगा झाला. भूषण कुमार हे टी-सीरिजचे प्रमुख असून त्यांनी या संगीत संस्थेला जागतिक स्तरावर पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या सर्व घटनांमुळे नोराच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सोशल मीडियावर नव्याने चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात या चर्चांना कोणतेही पायाभूत आधार नसल्याचे जाणकारांनी नमूद केले आहे.






