MP Breaking News
Sat, Dec 20, 2025

Box Office Collection : Avatar: Fire and Ash ला भारतीय बॉक्स ऑफिसवर धक्का; धुरंधरचा विक्रमी दौड सुरूच

Published:
धुरंधरच्या कहरामुळे ‘अवतार फायर अँड ऍश’चे पाय रोवायच्या आधीच थरथर कापले आहेत. हॉलीवूडची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असलेली ही तिसरी फिल्म शुक्रवारी भारतात रिलीज झाली. मात्र अंदाजापेक्षा कमकुवत सुरुवात करत 20 कोटींची ओपनिंग घेऊन ती पुढे सरसावली.
Box Office Collection : Avatar: Fire and Ash ला भारतीय बॉक्स ऑफिसवर धक्का; धुरंधरचा विक्रमी दौड सुरूच

Box Office Collection : धुरंधरच्या कहरामुळे ‘अवतार फायर अँड ऍश’चे पाय रोवायच्या आधीच थरथर कापले आहेत. हॉलीवूडची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असलेली ही तिसरी फिल्म शुक्रवारी भारतात रिलीज झाली. मात्र अंदाजापेक्षा कमकुवत सुरुवात करत 20 कोटींची ओपनिंग घेऊन ती पुढे सरसावली. जेम्स कॅमेरॉनच्या अवतार फ्रँचायझीच्या या भागाला प्रेक्षकांकडून मिश्र प्रतिसाद मिळाला. ‘अवतार 2’ने प्रथम दिवशी 40.30 कोटींची विक्रमी कमाई केली होती. त्याच्या तुलनेत ही आकडेवारी खूपच कमी मानली जात आहे.

धुरंदर तुफान फॉर्मात Box Office Collection

दरम्यान, रणवीर सिंहचा ‘धुरंधर’ बॉक्स ऑफिसवर तिसऱ्या सप्ताहात प्रवेश करूनही धडाडीने कमाई करत आहे. 15व्या दिवशी म्हणजे तिसऱ्या शुक्रवारीही ‘धुरंधर’ने 22.50 कोटींचा नेट कलेक्शन साधलं. त्यामुळे 15 दिवसांची कमाई तब्बल 483 कोटींवर पोहोचली आहे. सलग दोन आठवड्यांपासून ही फिल्म बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवत आहे.

कपिल शर्माची कॉमेडी-ड्रामा फिल्म ‘किस किसको प्यार करूं 2’ मात्र कमाईत कोलमडताना दिसत आहे. एका आठवड्यात केवळ 10.85 कोटींची कमाई करणाऱ्या या फिल्मने दुसऱ्या शुक्रवारी फक्त 22 लाख रुपये जमा केले. त्यामुळे 8 दिवसांत एकूण कलेक्शन 11.07 कोटींवर पोहोचले आहे.Box Office Collection

अखंडाचीही चांगली कमाई

नंदमुरी बालकृष्णच्या ‘अखंडा 2’नेही सात दिवसांमध्ये चांगली धाव घेतली आहे. दुसऱ्या शुक्रवारी या फिल्मने 1.50 कोटींची कमाई केली असून, आठ दिवसांची एकूण कमाई 78.50 कोटींवर पोहोचली आहे.

तर मलयाळम सुपरस्टार दिलीपच्या ‘भा भा बा’ने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात दाखवली. पहिल्या दिवशी 6.70 कोटींची कमाई करताना, दुसऱ्या दिवशीही फिल्मने 3.40 कोटींची कमाई साधली. त्यामुळे दोन दिवसांतच या फिल्मचा कलेक्शन 10.10 कोटींच्या टप्प्यावर पोहोचला आहे.

शुक्रवारीच्या बॉक्स ऑफिस रिपोर्टमधून स्पष्ट होतं की, ‘धुरंधर’चा दबदबा अजूनही कायम असून इतर फिल्म्स त्याच्या वेगाशी स्पर्धा करू शकत नाहीत. आगामी दिवसांत ‘अवतार फायर अँड ऍश’ प्रेक्षकांना थिएटरपर्यंत किती खेचते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.