Marathi News

धुरंधर’ फेम अभिनेता अडचणीत; मोलकरणीच्या धक्कादायक आरोपानंतर अटक

Published:
महिलेच्या म्हणण्यानुसार, दोघांचे संबंध तिच्या घरी तसेच वर्सोवा येथील नदीम खानच्या घरात ठेवले जात. पहिली घटना मालवणी पोलिसांच्या हद्दीत घडल्याचे समोर आल्यामुळे वर्सोवा पोलिसांनी हा गुन्हा मालवणी पोलिसांकडे वर्ग केला आहे.
धुरंधर’ फेम अभिनेता अडचणीत; मोलकरणीच्या धक्कादायक आरोपानंतर अटक

धुरंधर चित्रपटातून ओळख मिळवलेल्या अभिनेता नदीम खान याच्यावर गंभीर आरोपांमुळे अडचणींचे ढग दाटले आहेत. घरकाम करणाऱ्या 41 वर्षीय महिलेने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी नदीमला ताब्यात घेतलं असून या प्रकरणाची चौकशी आता अधिक वेगाने सुरू झाली आहे.

पीडित महिलेने दिलेल्या माहितीप्रमाणे, 2015 मध्ये ती प्रथम नदीम खानच्या संपर्कात आली. घरकामाच्या निमित्ताने सुरू झालेला परिचय काही महिन्यांतच वैयक्तिक नात्यात बदलला. महिलेचा आरोप आहे की, नदीमने तिला लग्नाचे आश्वासन देत जवळ घेतलं आणि त्याच आश्वासनाच्या जोरावर जवळपास दहा वर्षे शारीरिक संबंध ठेवते केले. मात्र नंतर त्याने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला, तेव्हा महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.

काय आहे आरोप

महिलेच्या म्हणण्यानुसार, दोघांचे संबंध तिच्या घरी तसेच वर्सोवा येथील नदीम खानच्या घरात ठेवले जात. पहिली घटना मालवणी पोलिसांच्या हद्दीत घडल्याचे समोर आल्यामुळे वर्सोवा पोलिसांनी हा गुन्हा मालवणी पोलिसांकडे वर्ग केला आहे. या गुन्ह्यात जबाब, पुरावे आणि दोन्ही ठिकाणच्या घटनांची पडताळणी सुरू आहे.

नदीम खान याने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये लहान-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. रणवीर सिंगच्या धुरंधर चित्रपटात रेहमान डकैतचा कूक अक़लाक ही भूमिका साकारल्यानंतर त्याला ओळख मिळाली. याशिवाय तो नीना गुप्ता आणि संजय शुक्ला यांच्या वध चित्रपटातही झळकला होता. अनेक जाहिराती आणि वेब प्रोजेक्ट्समध्येही त्याची उपस्थिती होती. सोशल मीडियावर तो कायम सक्रिय असून विविध पोस्टद्वारे आपल्या कामाची माहिती देत राहतो.

चौकशी सुरू

सध्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. पीडितेचे आरोप, पुरावे आणि गेल्या दहा वर्षांच्या घटनांची सखोल छाननी झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई कोणत्या दिशेने जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या प्रकरणामुळे मनोरंजन क्षेत्रातही खळबळ उडाली असून अनेक जणांनी न्याय प्रक्रियेची प्रतीक्षा ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews