MP Breaking News
Tue, Dec 16, 2025

विकी कौशलने आलिया भट्टला सर्वात आधी दाखवला मुलाचा फोटो? Filmfare OTT Awards त्या क्षणाची चर्चा

Published:
एका फोटोमध्ये विकी आपल्या मोबाईलवर आलियाला काहीतरी दाखवताना दिसत असून आलियाचा आश्चर्यचकित झालेला रिअॅक्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
विकी कौशलने आलिया भट्टला सर्वात आधी दाखवला मुलाचा फोटो? Filmfare OTT Awards त्या क्षणाची चर्चा

अलीकडे पार पडलेल्या Filmfare OTT Awards सोहळ्याने केवळ पुरस्कारांमुळेच नाही, तर सेलिब्रिटींच्या कॅंडिड क्षणांमुळेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमातून समोर आलेल्या काही फोटोमध्ये सध्या सर्वाधिक चर्चा विकी कौशल आणि आलिया भट्ट यांच्या एका खास क्षणाची होत आहे. एका फोटोमध्ये विकी आपल्या मोबाईलवर आलियाला काहीतरी दाखवताना दिसत असून आलियाचा आश्चर्यचकित झालेला रिअॅक्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

नेमकं काय घडलं?

हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांमध्ये वेगवेगळे अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. विकीच्या चेहऱ्यावरची हसू आणि आलियाचा अचानक व्यक्त झालेला सरप्राइज पाहता, अनेकांना वाटते की विकीने तिला आपल्या नवजात बाळाचा फोटो दाखवला असावा. विशेष म्हणजे विकी आणि कतरिना कैफ यांनी अद्याप आपल्या मुलाचा फोटो सार्वजनिक केलेला नाही, त्यामुळे या फोटोमागचं गूढ अधिकच वाढलं आहे.

सोशल मीडियावर चर्चा

या कार्यक्रमात विकी आणि आलिया एकमेकांच्या शेजारी बसले होते. दोघांमधील सहज संवाद आणि हा कॅंडिड मोमेंट कॅमेऱ्यात कैद झाला आणि तोच आता चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्सनी “विकी नक्कीच आलियाला आपल्या मुलाचा फोटो दाखवत आहे” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, या अंदाजांवर अद्याप विकी किंवा आलियाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये आपल्या पहिल्या मुलाचे स्वागत केले होते. सोशल मीडियावर त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअर केली असली, तरी बाळाचा चेहरा अद्याप गुप्तच ठेवला आहे. त्यामुळे Filmfare Awardsमधील हा क्षण चाहत्यांसाठी आणखी उत्सुकता वाढवणारा ठरत आहे.

दरम्यान, विकी कौशल आणि आलिया भट्ट लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या आगामी चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटात रणबीर कपूरचीही महत्त्वाची भूमिका असून, हा बिग बजेट सिनेमा 2026 च्या मध्यात प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच या दोघांच्या कॅंडिड क्षणामुळे चर्चांना उधाण आले आहे.