Marathi News

Disha Patani Boyfriend : दिशा पटानीच्या रूमर्ड बॉयफ्रेंडचा चेहरा अखेर समोर; पहा कोण आहे?

Published:
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांपेक्षा अधिक तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीचे नाव सध्या पंजाबी सिंगर तलविंदर सिंह सिद्धूसोबत जोडले जात असून, त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चा दिवसेदिवस वाढत आहेत
Disha Patani Boyfriend : दिशा पटानीच्या रूमर्ड बॉयफ्रेंडचा चेहरा अखेर समोर; पहा कोण आहे?

Disha Patani Boyfriend : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांपेक्षा अधिक तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीचे नाव सध्या पंजाबी सिंगर तलविंदर सिंह सिद्धूसोबत जोडले जात असून, त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चा दिवसेदिवस वाढत आहेत. नुपूर सॅनॉनच्या लग्नात दोघांचा हातात हात घालून फिरतानाचा व्हिडिओ सर्वप्रथम समोर आला आणि त्यानंतर दोघांना अनेकदा एकत्र पाहिल्याने या चर्चांना आणखी जोर मिळाला.

व्हिडिओ पाहून चाहते थक्क (Disha Patani Boyfriend)

तलविंदर नेहमीच चेहरा मास्क किंवा कव्हरने झाकून ठेवत असल्याने त्यांचे चेहरेवरचे रहस्य कायम होते. मात्र आता हे गूढ अखेर उलगडले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका नव्या व्हिडिओमुळे त्यांचा चेहरा स्पष्ट दिसला आणि हा व्हिडिओ पाहून चाहते अक्षरशः थक्क झाले. या फेस रिव्हीलचा अनोखा किस्सा म्हणजे टीव्ही अभिनेता मोहसिन खानने चुकून हे रहस्य उघड केले. त्याने झारा खानसोबत केलेला लिप-सिंक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये तलविंदर आपल्या मित्रांसोबत दिसत असून यावेळी त्यांनी मास्क घातलेला नव्हता. त्यामुळे त्यांचा चेहरा स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झाला.

सोशल मीडियावर प्रतिक्रियाना जोर

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला. एकाने लिहिले, “हा तर खूपच हँडसम आहे!”, तर दुसऱ्याने उत्साहाने लिहिले, “मी खूप दिवसांपासून त्याचा चेहरा पाहण्याची वाट पाहत होतो.” आणखी एका कमेंटमध्ये म्हटले गेले, “यार, दिल जिंकून घेतलं!” Disha Patani Boyfriend

काही दिवसांपूर्वी दिशा आणि तलविंदरचा हात धरून चालतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर चाहत्यांनी त्यांच्या नात्याला “ऑफिशियल” मानले असले तरी दोघांनीही याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तरीही फेस रिव्हीलनंतर दिशाच्या या कथित नात्याबद्दल चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews