श्रेया घोषालचे एक्स अकाउंट रिकव्हर, फेब्रुवारीमध्ये झाले होते हॅक; गायिकेने व्हिडिओच्या माध्यमातून दिली संपूर्ण माहिती

Published:
Last Updated:
फेब्रुवारीमध्ये हॅक झाल्यानंतर श्रेया घोषालचे एक्स अकाउंट परत मिळवले, गायिकेने व्हिडिओ संदेश पाठवला
श्रेया घोषालचे एक्स अकाउंट रिकव्हर, फेब्रुवारीमध्ये झाले होते हॅक; गायिकेने व्हिडिओच्या माध्यमातून दिली संपूर्ण माहिती

प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालला तिचं एक्स अकाऊंट पुन्हा मिळालं आहे.

प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालला तिचं एक्स अकाऊंट पुन्हा मिळालं आहे. मी पुन्हा एक्स अकाऊंटवर परतली आहे, असं श्रेयाने पोस्टमध्ये म्हटलंय. श्रेयाचं एक्स अकाऊंट फेब्रुवारी महिन्यात हॅक करण्यात आलं होतं.

श्रेया घोषालने एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की, मी पुन्हा परतली आहे. मी या ठिकाणी नेहमी व्यक्त होत राहीन आणि लिहित राहीन. माझ एक्स अकाऊंट अडचणीत आलं होतं. फेब्रुवारीत ते हॅक करण्यात आलं होतं. अखेर मला एक्स टीमकडून मदत मिळाली आहे. त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला. सर्वकाही ठीक आहे. आता मी इथे आहे..

सावध राहण्याचं केलं आवाहन…

श्रेया घोषालने पोस्टमध्ये लोकांना जागरुक राहण्यासाठी आवाहन केलं आहे. श्रेयाच्या विरोधात चुकीच्या पद्धतीनं पोस्ट करण्यात आल्या होत्या. यावर प्रतिक्रिया देताना श्रेया म्हणाली, हे क्लिक बेट्स आहेत. या पोस्ट स्पॅम आणि धोकादायक असतात. त्यांना तुम्ही वेळीच रिपोर्ट केलं पाहिजे. त्यांना बंद करण्याचा मला कोणताच अधिकार नाही. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केले आहेत.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews