Sat, Dec 27, 2025

Janhvi Kapoor : जान्हवी कपूरने बांग्लादेशातील हिंदू युवकाच्या निर्घृण हत्येबाबत उठवला आवाज; सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

Published:
जर अशा भीषण आणि हादरवून टाकणाऱ्या घटनांनीही लोकांच्या मनात रोष निर्माण होत नसेल, तर ते समाजासाठी अत्यंत धोकादायक आहे. तिने स्पष्टपणे सांगितले की कोणत्याही स्वरुपातील उग्रवादाची निंदा केलीच पाहिजे आणि त्याविरुद्ध आवाज उठवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे
Janhvi Kapoor : जान्हवी कपूरने बांग्लादेशातील हिंदू युवकाच्या निर्घृण हत्येबाबत उठवला आवाज; सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

Janhvi Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने बांग्लादेशात घडलेल्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मयमनसिंह येथे 27 वर्षीय हिंदू युवक दीपू चंद्र दास याची सार्वजनिकपणे, अत्यंत अमानवी पद्धतीने हत्या करण्यात आली. या घटनेबाबत जान्हवीने सोशल मीडियावरून कठोर शब्दांत प्रतिक्रिया देत ही घटना ‘बर्बरतेची परिसीमा’ असल्याचे सांगितले. गुरुवारी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे जान्हवी कपूरने दीपू चंद्र दास यांचे नाव लिहित एक दीर्घ संदेश शेअर केला. तिने म्हटले की बांग्लादेशात घडणाऱ्या अशा घटना एखाद्या एकट्या प्रसंगाचा परिणाम नाहीत, तर तिथे सातत्याने सुरू असलेल्या हिंसेचा गंभीर आणि भीषण चेहरा आहेत.

जाह्नवी कपूरचा संताप उफाळला (Janhvi Kapoor)

आपल्या पोस्टमध्ये जान्हवीने लोकांना आवाहन केले की ज्यांना या निर्घृण घटनेविषयी माहिती नाही त्यांनी याबाबत वाचावे, सत्य जाणून घ्यावे आणि प्रश्न विचारावेत. तिच्या म्हणण्यानुसार, जर अशा भीषण आणि हादरवून टाकणाऱ्या घटनांनीही लोकांच्या मनात रोष निर्माण होत नसेल, तर ते समाजासाठी अत्यंत धोकादायक आहे. तिने स्पष्टपणे सांगितले की कोणत्याही स्वरुपातील उग्रवादाची निंदा केलीच पाहिजे आणि त्याविरुद्ध आवाज उठवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जगभरात घडणाऱ्या अत्याचारांवर दु:ख व्यक्त करण्यापूर्वी आपल्या आसपास घडणाऱ्या हिंसाचाराकडे दुर्लक्ष करणे मानवतेसाठी घातक आहे, असेही तिने नमूद केले. Janhvi Kapoor

फॅन्सकडून जोरदार प्रतिसाद

जाह्नवीचा हा पोस्ट व्हायरल होताच नेटिझन्सच्या प्रतिक्रिया ओघाने येऊ लागल्या. अनेकांनी अशा संवेदनशील आणि विवादित विषयावर निर्भीडपणे बोलल्याबद्दल तिची प्रशंसा केली. काही यूजर्सने म्हटले की जेव्हा अनेक सेलेब्रिटी अशा मुद्द्यांवर शांत राहणे पसंत करतात, तेव्हा जान्हवीने निर्धास्तपणे आपले मत मांडल्याने ती धाडसी कलाकार असल्याचे सिद्ध होते. तिच्या संवेदनशीलता, सामाजिक जाण आणि योग्य गोष्टीसाठी आवाज उठवण्याची तयारी याबद्दल नेटिझन्सकडून स्तुतीचा वर्षाव होत आहे.