MP Breaking News
Sat, Dec 20, 2025

Javed Akhtar Slam Nitish Kumar : नितीश कुमार माफी मागा!! हिजाब ओढल्याने जावेद अख्तर संतापले

Published:
नीतीश कुमार यांनी एका मुस्लिम महिला डॉक्टरसोबत जे केले ते बरोबर आहे. मी याची कठोर शब्दांत निंदा करतो. श्री नीतीश कुमार यांनी त्या महिलेची माफी मागायला हवी अशी मागणी जावेद अख्तर यांनी केली
Javed Akhtar Slam Nitish Kumar :  नितीश कुमार माफी मागा!! हिजाब ओढल्याने जावेद अख्तर संतापले

Javed Akhtar Slam Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी सर्वांसमोर एका डॉक्टर मुस्लीम महिलेचा बुरखा ओढला. 15 डिसेंबर रोजी, जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार आयुष डॉक्टरांना नियुक्ती पत्रे देत होते, तेव्हा त्यांनी त्यापैकी एका नुसरत नावाच्या महिला डॉक्टरचा बुरखा ओढला. नितीश कुमार यांच्या या अजब वर्तुणुकीवरून संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. याच पार्श्वभूमीवर जावेद अख्तर यांनी सुद्धा नितीश कुमार यांना खडेबोल सुनावले. नितीश कुमार यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी जावेद अख्तर यांनी केली आहे.

काय म्हणाले जावेद अख्तर? Javed Akhtar Slam Nitish Kumar

जावेद अख्तर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. जे लोक मला ओळखतात, त्यांना माहिती आहे की मी पडद्याच्या पारंपरिक संकल्पनेचा किती विरोधक आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी कधीही हे मान्य करेन की श्री नीतीश कुमार यांनी एका मुस्लिम महिला डॉक्टरसोबत जे केले ते बरोबर आहे. मी याची कठोर शब्दांत निंदा करतो. श्री नीतीश कुमार यांनी त्या महिलेची माफी मागायला हवी अशी मागणी जावेद अख्तर यांनी केली. Javed Akhtar Slam Nitish Kumar

राखी सावंतने सुद्धा साधला निशाणा

दरम्यान बॉलीवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखी सावंतने सुद्धा नितीश कुमार यांच्या वर्तनुकीवरून टीकेची झोड उठवली. नितीशकुमार, इतके दिग्गज नेते आहात तुम्ही. मी तुमचा आदर करते. परंतु तुम्ही हे काय करून बसलात? तुम्ही एका महिलेचा, एका मुस्लिम महिलेचा नकाब ओढताय. किती चुकीची गोष्ट आहे ही नितीशजी.  जर मी तुमच्यापाशी आले आणि सगळ्यांसमोर तुमचं धोतर खेचलं, तुमच्या पॅन्टचा नाडा ओढला तर चालेल का? तुम्ही एका महिलेला इज्जत देता आणि लगेच तिची इज्जत काढून घेता. तुम्हाला लाज वाटत नाही का? असा सवाल करत राखी सावंतने आपला संताप व्यक्त केला.