डिवोर्सनंतर महिन्याभरातच माही विजची नवी वाटचाल; परिवारासोबत गृहप्रवेशाची विधीपूजा

Published:
माहीने पोस्ट केलेल्या छायाचित्रांमध्ये नव्या घराची बाल्कनी, सुंदर दृश्ये, तसेच पूजा करतानाचे भावनिक क्षणही दिसतात. तिच्या कुटुंबीयांनीही या पूजेत सहभागी होत तिला मानसिक आणि भावनिक आधार दिला
डिवोर्सनंतर महिन्याभरातच माही विजची नवी वाटचाल; परिवारासोबत गृहप्रवेशाची विधीपूजा

टीव्ही अभिनेत्री माही विज गेल्या काही दिवसांपासून आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. जय भानुशालीपासून विभक्त होण्याच्या निर्णयानंतर तिच्या आयुष्यात काय बदल होणार याकडे अनेकांचे लक्ष होते. आता माहीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही खास क्षणांमुळे तिच्या आयुष्याला नवी दिशा मिळत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

अलीकडेच माही विजने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीत एकापाठोपाठ अनेक फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये ती आपल्या कुटुंबासोबत पूजा करताना दिसत आहे. या विधीला पाहून फॅन्स आणि नेटिझन्सनी अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे की माहीने कदाचित नवे घर घेतले असावे आणि त्याचाच गृहप्रवेश पूजा तिने केला आहे. जरी माहीने थेट “नवे घर” असे उल्लेखले नसले तरी पूजेचा देखावा, सजावट आणि कॅप्शन्समधील “नई शुरुआत” हा शब्द यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

माही विज आणि जय भानुशाली यांनी 15 वर्षांच्या नात्यानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर या जोडप्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. दरम्यान, माहीवर काही ट्रोल्सनी केलेल्या कमेंट्सना तिने ठाम उत्तरही दिले होते. मात्र आता तिच्या शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये ती मन:शांती, आत्मविश्वास आणि नवी ऊर्जा घेऊन पुढे जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

काय आहे फोटो मध्ये

माहीने पोस्ट केलेल्या छायाचित्रांमध्ये नव्या घराची बाल्कनी, सुंदर दृश्ये, तसेच पूजा करतानाचे भावनिक क्षणही दिसतात. तिच्या कुटुंबीयांनीही या पूजेत सहभागी होत तिला मानसिक आणि भावनिक आधार दिला. एका फोटोमध्ये तिने आपल्या आईबद्दल, *“स्वस्थ रहा, आम्हाला तुमची गरज आहे ”* असे लिहून आईवरील प्रेम, आदर आणि तिच्या उपस्थितीचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

फॅन्स कडून शुभेच्छा

या पोस्ट्स सोशल मीडियावर शेअर होताच फॅन्सकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. अनेकांनी तिच्या नव्या सुरुवातीसाठी पाठिंबा दर्शवला, तर काहींनी तिच्या धैर्याचे आणि सकारात्मकतेचे कौतुक केले.

डिवोर्स नंतर केवळ महिन्याभरातच माहीने स्वतःला सावरत आयुष्याची नवी पायरी चढण्याचा घेतलेला हा निर्णय तिच्या चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews