MP Breaking News
Sat, Dec 20, 2025

Marathi Serials : आता तर हद्द पार केली.. बंद करा मालिका!! या मालिकेवर पुन्हा एकदा प्रेक्षक भडकले

Published:
स्त्रीवर होणारा अन्याय आणि सहन करणाऱ्या नायिकेवर प्रचंड टीका होताना दिसत आहे. त्यामुळे आता ही मालिकाच बंद करा अशी मागणी थेट प्रेक्षकांमधूनच होताना दिसते
Marathi Serials : आता तर हद्द पार केली.. बंद करा मालिका!! या मालिकेवर पुन्हा एकदा प्रेक्षक भडकले

Marathi Serials : मराठी चॅनल्सवर अशा काही मालिका आहेत ज्यांचा प्रेक्षकांना अक्षरशः कंटाळा आलाय. त्या मालिकांचं कथानक, मालिकांमधील कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नाहीत. काही जणांना मालिकेची स्टोरी आवडत नाही… अशीच एक मालिका म्हणजे मी संसार माझा रेखिते’… स्त्रीवर होणारा अन्याय आणि सहन करणाऱ्या नायिकेवर प्रचंड टीका होताना दिसत आहे. त्यामुळे आता ही मालिकाच बंद करा अशी मागणी थेट प्रेक्षकांमधूनच होताना दिसते

काय आहे कारण? Marathi Serials 

‘मी संसार माझा रेखिते’ ही सन मराठीवरील नवी मालिका काही दिवसापूर्वी सुरू झाले. मात्र यामध्ये स्त्रीवर होणारा अन्याय आणि सहन करणाऱ्या नायिकेवर प्रचंड टीका होताना दिसत आहे. आताच्या AI च्या काळात आईवर अशाप्रकारे अन्याय कुठे होतात का? याआधी सुद्धा बायकोने मित्राच्या हाताची बासुंदी खाल्ल्यानंतर नवऱ्याने बायकोला जबरदस्तीने पातेल भरून बासुंदी खाऊ घातल्यानंतर प्रेक्षकांनी त्या प्रोमोवर प्रचंड टीका केली. आता पुन्हा नव्या प्रोमोमध्ये वडिलांना हॉस्पिटलमधून भेटून आलेल्या लेकीवर अश्या प्रकारे होणारा अन्याय आणि त्याचे क्रूर चित्रीकरण यावर सध्या लोकांचा भयंकर राग दिसत आहे. मालिका बंद करा अश्या कमेंट सध्या या प्रोमोवर येताना दिसत आहेत. Marathi Serials

काय आहेत कमेंट्स

मी संसार माझा रेखिते या सिरीयल बाबत सोशल मीडियावर टीकेची जोड उठविण्यात येते. सोशल मीडियावर एका युजरने म्हटले की दिग्दर्शकाने डोके गहाण ठेवून मालिका हातात घेतली आहे आणि पैसे मिळत असल्याने कलाकारही कसलाच विचार करत नाहीत. दुसऱ्या एका युजरने म्हटले, नवरा आणि सासू सुनेचा किती छळ करत आहेत ते या सिरीयल मध्ये दाखवलं आहे,. हे सगळं बंद करा बाईचा छळ करायचा हेच तुम्हाला दाखवायचा आहे का असा सवाल प्रेक्षकाने केला?? तर तिसऱ्या एका वापर करताना म्हटले की मालिका एकदम फालतू आहे…. तर आणखी एका वापरकर्त्याने म्हटले की काहीही दाखवू नका….बंद करा ही फालतू मालिका.