MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

Oscars 2026 : कॅन्स ते हॉलीवूड! ‘होमबाउंड’ ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट; भारतीय सिनेमा पुन्हा चमकला

Published:
या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन नीरज घायवान यांनी केले असून अभिनयात जाह्नवी कपूर, ईशान खट्टर आणि विशाल जेठवा यांची प्रमुख भूमिका आहे. शॉर्टलिस्ट जाहीर झाल्यानंतर तिघांनीही इंस्टाग्रामवर भावना व्यक्त केल्या.
Oscars 2026 : कॅन्स ते हॉलीवूड! ‘होमबाउंड’ ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट; भारतीय सिनेमा पुन्हा चमकला

Oscars 2026 : ऑस्करच्या शर्यतीत भारतीय चित्रपटांचा जोर पुन्हा एकदा जाणवू लागला आहे. निर्माता करण जौहर यांच्या धर्मा प्रोडक्शनअंतर्गत निर्मित ‘होमबाउंड’ या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घेत ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट होण्याचा मान मिळवला आहे. कॅन्सपासून टोरोंटोपर्यंतची यशस्वी फेस्टिव्हल जर्नी पार करत अखेर ‘होमबाउंड’ने हॉलीवूडच्या प्रतिष्ठित पुरस्कार दरबारात प्रवेश मिळवला. चित्रपटाशी संबंधित कलाकार आणि तांत्रिक टीमसाठीb हा नक्कीच अभिमानाचा क्षण आहे. करण जौहर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपला आनंद शब्दांत व्यक्त केला. त्यांनी लिहिले की, ‘होमबाउंड’ने कॅन्स ते ऑस्करपर्यंतचा प्रवास गाठला आणि या यशस्वी जर्नीचा भाग असेल यापेक्षा मोठं स्वप्न काही असू शकत नाही.

कोणकोणाची प्रमुख भूमिका (Oscars 2026)

या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन नीरज घायवान यांनी केले असून अभिनयात जाह्नवी कपूर, ईशान खट्टर आणि विशाल जेठवा यांची प्रमुख भूमिका आहे. शॉर्टलिस्ट जाहीर झाल्यानंतर तिघांनीही इंस्टाग्रामवर भावना व्यक्त केल्या. जाह्नवीने ऑस्कर शॉर्टलिस्ट पोस्ट शेअर करत म्हटले की, “होमबाउंड 98 व्या अकॅडमी अवॉर्ड्सच्या बेस्ट इंटरनॅशनल फीचर श्रेणीत शॉर्टलिस्ट झाली आहे. अंतिम नॉमिनेशन्स जानेवारीत जाहीर होतील. ईशानने अनेक हार्ट इमोजी शेअर करत आनंद व्यक्त केला, तर विशाल जेठवाने स्वतःच्या पोस्टमध्ये वडिलांची आठवण करून भावूक विधान लिहिले. तो म्हणाला, “आज पापा असते तर फार अभिमान वाटला असता.”

या आधी ‘होमबाउंड’ची स्क्रीनिंग कॅन्स आणि टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली होती. दोन्हीकडे प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात चित्रपटाचे स्वागत केले होते. आता ऑस्कर शॉर्टलिस्टपर्यंत पोहोचल्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीसाठीही हा महत्वपूर्ण मैलाचा दगड ठरणार आहे. आताचा मोठा प्रश्न म्हणजे अंतिम नॉमिनेशनमध्ये ‘होमबाउंड’ आपली जागा पक्की करते का?

कधी आहे 2026 चा ऑस्कर

फेब्रुवारीत होणाऱ्या ऑस्कर सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे चाहत्यांमध्ये चित्रपटाच्या भारतातील रिलीज आणि ओटीटी राइट्सचीही उत्सुकता वाढू लागली आहे. ‘होमबाउंड’कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक उंचावल्या आहेत. ऑस्करमधील यश भारतीय चित्रपटविश्वासाठी नवी दारे उघडू शकते, असे समीक्षक मत व्यक्त करत आहेत.