Palash Muchhal : लग्नाच्या आदल्या रात्री दुसऱ्याच मुलीसोबत रंगेहाथ सापडला पलाश; महिला क्रिकेटने चांगलाच धुतला

Published:
पलाश मुच्छल एका अन्य महिलेसोबत खोलीत रंगेहाथ सापडल्याने एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर वातावरण चांगलंच तापलं आणि भारतीय महिला क्रिकेट संघातील काही खेळाडूंनी पलाशवर तीव्र संताप व्यक्त केला
Palash Muchhal : लग्नाच्या आदल्या रात्री दुसऱ्याच मुलीसोबत रंगेहाथ सापडला पलाश; महिला क्रिकेटने चांगलाच धुतला

Palash Muchhal : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या विवाहाबाबत मोठी चर्चा रंगली होती. दोघांचं लग्न मोठ्या थाटामाटात होणार असल्याचं निश्चित झालं होतं आणि दोन्ही कुटुंबांतील पाहुणेही विवाहस्थळी दाखल झाले होते. मात्र ऐनवेळी हा विवाह रद्द करण्यात आला.

सुरुवातीला स्मृतीच्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्यामुळे लग्न थांबवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. मात्र यामागे आणखी काही गंभीर कारणं असल्याच्या चर्चांना उधाण आलं. पलाश मुच्छलने स्मृतीची फसवणूक केल्याचे आरोपही समोर येऊ लागले होते. आता या प्रकरणात स्मृतीच्या जवळच्या व्यक्तीने धक्कादायक माहिती उघड केली आहे.

लग्नाआधीच पलाशने केलं कांड (Palash Muchhal)

स्मृतीचा मित्र विज्ञान माने याने सांगितले की, तो स्वतः स्मृती–पलाश यांच्या विवाहसोहळ्यासाठी उपस्थित होता. त्यावेळी पलाश मुच्छल एका अन्य महिलेसोबत खोलीत रंगेहाथ सापडल्याने एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर वातावरण चांगलंच तापलं आणि भारतीय महिला क्रिकेट संघातील काही खेळाडूंनी पलाशवर तीव्र संताप व्यक्त केला. “तो प्रसंग अत्यंत धक्कादायक होता. संपूर्ण कुटुंब हादरून गेलं होतं. लग्नानंतर ते सांगलीत स्थायिक होतील असं वाटत होतं, पण घडलेलं सगळंच वेगळं निघालं,” असं विज्ञान माने यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितलं. Palash Muchhal

फसवणुकीचा सुद्धा आरोप

इतकंच नाही तर विज्ञान माने यांनी पलाश मुच्छल यांच्याविरोधात तब्बल 40 लाख रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हाही दाखल केला आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पलाश यांनी एका चित्रपटासाठी गुंतवणूक करण्यास सांगितलं होतं. लवकरच तो चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल आणि गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल, असं आश्वासन देण्यात आलं होतं. या शब्दांवर विश्वास ठेवून 40 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. मात्र चित्रपट अर्धवट राहिला, काम बंद पडलं आणि पैसे परत मिळाले नाहीत. अनेक वेळा संपर्क साधूनही पलाशकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचं सांगण्यात आलं.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews