Palash Muchhal : पलाश मुच्छल अडचणीत; सांगलीत 40 लाखांच्या कथित फसवणुकीची तक्रार दाखल

Published:
स्मृती मंधानाचे बालमैत्री आणि फिल्म फाइनान्सर वैभव मान यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. वैभव यांच्या मते, त्यांची ओळख स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधाना यांनीच पलाश मुच्छल यांच्याशी करून दिली होती
Palash Muchhal : पलाश मुच्छल अडचणीत; सांगलीत 40 लाखांच्या कथित फसवणुकीची तक्रार दाखल

Palash Muchhal : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधानाचा माजी प्रियकर आणि चित्रपट दिग्दर्शक पलाश मुच्छल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. नुकतीच त्यांच्या आणि स्मृतीच्या साखरपुड्याची सांगता झाल्यानंतर तो चर्चेत आला होता. आता त्याच्यावर सांगलीमध्ये तब्बल 40 लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

वैभव मान यांची थेट तक्रार (Palash Muchhal)

स्मृती मंधानाचे बालमैत्री आणि फिल्म फाइनान्सर वैभव मान यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. वैभव यांच्या मते, त्यांची ओळख स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधाना यांनीच पलाश मुच्छल यांच्याशी करून दिली होती. कथितपणे या भेटीत मुच्छल यांनी त्यांना आपल्या ‘नजरिया’ नावाच्या चित्रपटात गुंतवणूक करण्यास सांगितले होते.

वैभव मान यांनी पोलिसांना सांगितले की, पलाश यांनी चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी गुंतवणुकीवर परतावा तात्काळ मिळेल, असेही आश्वस्त केले होते. या सर्व दाव्यांवर विश्वास ठेवून वैभव यांनी 40 लाख रुपये गुंतवले. मात्र, चित्रपट पूर्ण न झाल्याने आणि काम थांबल्याने गुंतवणूक परत करण्याचे आश्वासनही पूर्ण झाले नाही. Palash Muchhal

अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पोलिसांत धाव

तक्रारीत वैभव यांनी नमूद केले की, चित्रपटाचे काम पूर्णपणे बंद झाल्यानंतरही पलाश यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. अनेक महिन्यांपर्यंत संपर्क साधूनही गुंतवणुकीची रक्कम न मिळाल्याने त्यांनी सांगली पोलिसांकडे फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. वैभव यांनी त्यांच्या दाव्याला आधार देणारी कागदपत्रेही पोलिस अधीक्षकांकडे जमा केल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे.

वैयक्तिक नात्यातील तणावानंतर नवा वाद

स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांचा विवाह 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार होता. परंतु कुटुंबातील आरोग्याच्या कारणास्तव विवाह पुढे ढकलण्यात आला. मात्र, डिसेंबर 2025 मध्ये दोघांनीही अधिकृतपणे नातं संपुष्टात आल्याची घोषणा केली. त्यानंतर काही काळ सोशल मीडियावर पलाशविरुद्ध बेवफाईचे आरोपही झाले, ज्यामुळे त्यांच्या प्रतिमेवर मोठा परिणाम झाला.

साखरपुडा तुटल्यानंतर पलाशने वक्तव्य करताना हे त्यांच्या जीवनातील सर्वात कठीण दिवस असल्याचे सांगितले होते. त्यांनी लोकांनी अफवांवर प्रतिक्रिया देऊ नये, असेही आवाहन केले होते. आता आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे त्यांच्यासमोर आणखी एक मोठे संकट उभे आहे.

पुढील तपासावर सर्वांचे लक्ष

चित्रपट गुंतवणूक, ओटीटी रिलीजचे आश्वासन, थकीत रक्कम आणि संपर्क टाळल्याचे आरोप या संपूर्ण प्रकरणाला गंभीर वळण देत आहेत. सांगली पोलिसांच्या चौकशीचे निष्कर्ष काय येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews