Pathan 2 : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने 2023 मध्ये ‘पठान’ या चित्रपटातून दणक्यात कमबॅक केला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार यश मिळवत शाहरुखला पुन्हा एकदा अव्वल स्थानावर नेऊन ठेवले. आता या सुपरहिट चित्रपटाच्या सिक्वेल ‘पठान 2’बाबत महत्त्वाची माहिती समोर येत असून, या चित्रपटात शाहरुखसमोर एका मोठ्या साऊथ स्टारची एन्ट्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोण देणार शाहरुखला टक्कर (Pathan 2)
मिळालेल्या माहितीनुसार, यशराज फिल्म्स ‘पठान 2’च्या तयारीला लागली असून हा सिनेमा YRF च्या स्पाय युनिव्हर्सचाच भाग असणार आहे. या वेळी शाहरुख खानच्या अपोजिट साऊथ इंडस्ट्रीतील आघाडीचा अभिनेता जूनियर एनटीआर दिसू शकतो, अशा चर्चा सध्या रंगत आहेत. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, आदित्य चोप्रा या भूमिकेसाठी जूनियर एनटीआरच्या नावाचा विचार करत आहेत. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
जूनियर एनटीआर याआधीही YRF च्या स्पाय युनिव्हर्सचा भाग राहिला आहे. ऋतिक रोशनसोबत ‘वॉर 2’मध्ये त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्या चित्रपटात तो नेगेटिव्ह कॅरेक्टरमध्ये दिसला होता आणि त्याच्या अभिनयाचे जोरदार कौतुक झाले होते. रिपोर्ट्सनुसार, ‘पठान 2’मध्येही त्याची भूमिका तितकीच दमदार आणि प्रभावी असणार आहे. Pathan 2
कधी झाला चित्रपट कन्फर्म
दरम्यान, ‘पठान 2’ कन्फर्म झाल्याची माहिती अलीकडेच दुबईतील एका इव्हेंटमध्ये समोर आली. या कार्यक्रमाला स्वतः शाहरुख खान उपस्थित होता. रिअल इस्टेट डेव्हलपरने स्टेजवर बोलताना म्हटले होते की, एखादा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला, तर त्याचा सिक्वेल येतोच. ‘पठान’प्रमाणेच आता ‘पठान 2’ येणार असल्याचे त्याने सूचित केले. रिपोर्ट्सनुसार, ‘पठान 2’ केवळ पहिल्या भागाची कथा पुढे नेणार नाही, तर YRF स्पाय युनिव्हर्समधील आगामी मोठ्या संघर्षांची भक्कम पायाभरणीही करणार आहे. त्यामुळे शाहरुख खान विरुद्ध जूनियर एनटीआर असा थरारक सामना पाहायला मिळतो का, याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.





