Prashant Tamang Death : इंडियन आयडॉल विजेता प्रशांत तमांग यांचे अचानक निधन; संगीतविश्वाला मोठा धक्का!

Published:
प्रशांत तमांग यांचा जन्म 4 जानेवारी 1983 रोजी पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे झाला. त्यांच्या वडिलांचे निधन एका अपघातात झाल्यानंतर त्यांनी कोलकाता पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून नोकरी स्वीकारली
Prashant Tamang Death : इंडियन आयडॉल विजेता प्रशांत तमांग यांचे अचानक निधन; संगीतविश्वाला मोठा धक्का!

Prashant Tamang Death : इंडियन आयडॉलच्या तिसऱ्या सिझनचे विजेते आणि लोकप्रिय गायक-कलाकार प्रशांत तमांग यांच्या निधनाची दुःखद बातमी मनोरंजन क्षेत्रातून समोर आली आहे. केवळ 43 व्या वर्षी प्रशांत यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांच्या जवळच्या सूत्रांनी दिली आहे. 10 जानेवारीच्या रात्री त्यांना अचानक स्ट्रोक आला आणि उपचार सुरू होण्याआधीच त्यांची प्रकृती ढासळली.

11 जानेवारीच्या सकाळी ते दिल्लीमध्ये होते, असे सांगितले जाते. संगीत दिग्दर्शक आणि फिल्ममेकर राजेश घटानी यांनी प्रशांत यांच्या निधनाची अधिकृत पुष्टी केली आहे. त्यांच्या निधनाने इंडियन म्युझिक इंडस्ट्री आणि नेपाळी फिल्म इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

कोण आहेत प्रशांत तमांग (Prashant Tamang Death)

प्रशांत तमांग यांचा जन्म 4 जानेवारी 1983 रोजी पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे झाला. त्यांच्या वडिलांचे निधन एका अपघातात झाल्यानंतर त्यांनी कोलकाता पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून नोकरी स्वीकारली. पोलिस ऑर्केस्ट्रामध्ये काम करत असतानाच त्यांनी आपल्या गायन कौशल्याला धार दिली. 2007 साली इंडियन आयडॉलचा तिसरा सिझन त्यांनी जिंकला आणि त्यांना तब्बल 70 मिलियन मतं मिळाली. या विजयामुळे ते देशभरात प्रचंड लोकप्रिय झाले.

गायकीसोबतच त्यांनी अभिनय क्षेत्रातही पाऊल टाकले. ‘गोरखा पलटन’ आणि ‘परदेशी’ या नेपाळी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. अॅमेझॉन प्राईमच्या पाताल लोक सिझन 2 मध्येही ते झळकले होते. पुढील महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’मध्येही ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. अपूर्वा लाखिया दिग्दर्शित हा चित्रपट 2020 मधील गलवान घटनेवर आधारित असून 17 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

सर्वत्र हळहळ व्यक्त

अलीकडेच ‘बॅटल ऑफ गलवान’चा टीझर रिलीज झाला होता. प्रशांत तमांग यांनी स्वतः तो टीझर आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता. सोशल मीडियावर ते सतत कुटुंबासोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असत. त्यांच्या निधनाने चाहत्यांपासून इंडस्ट्रीतील कलाकारांपर्यंत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.