Mon, Dec 22, 2025

Rashmika Mandanna Mysaa Look : रश्मिका मंदानाचा‘मैसा’मधील लूक समोर, थरारक पोस्टरने चाहत्यांमध्ये उत्सुकता

Published:
मैसा’ या चित्रपटात रश्मिका एक गोंड आदिवासी समुदायातील महिलेची भूमिका साकारत आहे. आपली जमीन, माणसं आणि अस्मिता वाचवण्यासाठी झगडणाऱ्या एका योद्धा स्त्रीची कहाणी या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येणार आहे
Rashmika Mandanna Mysaa Look : रश्मिका मंदानाचा‘मैसा’मधील लूक समोर, थरारक पोस्टरने चाहत्यांमध्ये उत्सुकता

Rashmika Mandanna Mysaa Look : दक्षिण चित्रपटसृष्टीतून बॉलिवूडपर्यंत प्रवास करत प्रेक्षकांच्या मनात घर करणारी रश्मिका मंदाना पुन्हा चर्चेत आली आहे. येत्या चित्रपट ‘मैसा’साठी तिचा नवा पोस्टर लाँच झाला असून या पोस्टरमधील रश्मिकाचा अवतार पाहून चाहत्यांच्या नजरा खिळून राहिल्या. हातात तलवार, मनगटात हातकडी आणि चेहऱ्यावर कठोर भाव; या लूकने तिच्या आगामी पात्राचे धूसर पण तितकेच प्रभावी संकेत दिले आहेत.

गोंड आदिवासी समुदायातील महिलेची भूमिका – Rashmika Mandanna Mysaa Look

‘मैसा’ या चित्रपटात रश्मिका एक गोंड आदिवासी समुदायातील महिलेची भूमिका साकारत आहे. आपली जमीन, माणसं आणि अस्मिता वाचवण्यासाठी झगडणाऱ्या एका योद्धा स्त्रीची कहाणी या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येणार आहे. आतापर्यंत कॉलेज गर्ल, प्रेमकथेतील नायिका, आणि ऐतिहासिक भूमिकाही साकारणाऱ्या रश्मिकासाठी हा लूक पूर्णतः वेगळा आणि आव्हानात्मक असेल, अशी चर्चा रंगली आहे. Rashmika Mandanna Mysaa Look

रश्मिकाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले की, ‘मैसा’ची पहिली झलक २४ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. “ही कहाणी जग विसरणार नाही, आणि माझं नावही,” असं म्हणत तिने या चित्रपटाबद्दलचं कुतूहल आणखी वाढवलं आहे. अनफॉर्म्युला फिल्म्सच्या निर्मितीत तयार होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रवींद्र पुल्ले यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या पहिल्या लूकमध्ये रक्तरंजित संघर्षाचे संकेत मिळाले होते. शस्त्रसज्ज रश्मिकाचा लूक पाहून चाहते आणि समीक्षक दोघेही आश्चर्यचकित झाले.

चित्रपटात काय आहे?

चित्रपटात संघर्षाचा प्रवास, शोषणाविरुद्धची उभारी आणि स्वतःच्या लोकांसाठी उभारलेली तलवार असा थरारक कथानक दिसेल, असा संकेत निर्मात्यांनी दिला आहे. या भूमिकेद्वारे रश्मिका भारतीय सिनेमा आणि सामाजिक कथानकांना एक वेगळा आयाम देऊ शकते, अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे.

2025 च्या जून महिन्यात रश्मिकाने ‘मैसा’ करण्याची अधिकृत घोषणा केली होती. त्या वेळी तिने सांगितले होते की ती प्रत्येक वेळेस प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन आणि धाडसी करण्याचा प्रयत्न करते. ‘मैसा’ही तिच्यासाठी एक महत्त्वाकांक्षी आणि मनापासून केलेला प्रकल्प असेल, असा विश्वास तिने व्यक्त केला होता. आता पहिल्या झलक आणि पोस्टरसमोर आल्यानंतर ‘मैसा’बद्दलची चर्चा चांगलीच रंगली आहे. रश्मिकाचा हा नवा आणि धडकी भरवणारा अवतार सिनेमात कसा खुलतो, हे पाहण्यासाठी प्रेक्षक २४ डिसेंबरची उत्कंठेने वाट पाहत आहेत.