Marathi News

नियम सर्वांसाठी सारखेच! एअरपोर्टवर शाहरुख खानला काढायला लावला चष्मा

Published:
सिक्युरिटी ऑफिसरने शाहरुखचा पासपोर्ट तपासल्यानंतर त्यांना डोळ्यांवरील चष्मा काढण्यास सांगितले, जेणेकरून त्यांच्या चेहऱ्याची ओळख व्यवस्थित करता येईल. शाहरुखनेही कोणताही आढेवेढा न घेता लगेचच चष्मा काढला आणि नियमाप्रमाणे ओळख प्रक्रिया पूर्ण केली
नियम सर्वांसाठी सारखेच! एअरपोर्टवर शाहरुख खानला काढायला लावला चष्मा

मुंबई विमानतळावर घेतलेला अभिनेता शाहरुख खानचा एक ताजा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये किंग खान कारमधून उतरून टर्मिनलकडे जाताना दिसतात. मात्र सिक्युरिटी चेकदरम्यान घडलेल्या एका छोट्या प्रसंगाने नेटिझन्सचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.

काय आहे व्हिडिओत

व्हिडिओनुसार, सिक्युरिटी ऑफिसरने शाहरुखचा पासपोर्ट तपासल्यानंतर त्यांना डोळ्यांवरील चष्मा काढण्यास सांगितले, जेणेकरून त्यांच्या चेहऱ्याची ओळख व्यवस्थित करता येईल. शाहरुखनेही कोणताही आढेवेढा न घेता लगेचच चष्मा काढला आणि नियमाप्रमाणे ओळख प्रक्रिया पूर्ण केली. या प्रसंगात शाहरुख खानची साधी, नम्र प्रतिक्रिया पाहून चाहत्यांनी त्यांच्या शिस्तबद्ध स्वभावाचे कौतुक केले आहे.

चष्मा काढल्यानंतर सिक्युरिटी ऑफिसरने “ही फक्त प्रक्रिया आहे” असे सांगितल्यावर शाहरुख हसताना दिसतात. त्याच क्षणी ऑफिसरही हसतो आणि दोघांमधील हलकी स्मित-देवाणघेवाण फॅन्सच्या मनात घर करून जाते. स्टारडम असूनही नियमांचे काटेकोर पालन करणारा शाहरुख पाहून नेटिझन्स त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

शाहरुखचे सध्या काय चाललं आहे

दुसरीकडे, शाहरुख खान बराच काळ मोठ्या पडद्यापासून दूर आहेत. पठान, जवान आणि डंकीसारख्या धमाकेदार यशानंतर त्यांनी आपल्या मुलगी सुहाना खानसोबत ‘किंग’ नावाचा प्रोजेक्ट सुरु केला आहे. या चित्रपटाचे शूटिंग अंतिम टप्प्यात असून यंदाच्या वर्षाखेरीस शाहरुख पुन्हा थिएटर्समध्ये परतण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी ‘किंग’ चित्रपटाचा फर्स्ट लुक टीझर प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांकडून मोठी दाद मिळाली. हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत सिद्धार्थ आनंद—ज्यांनी ‘पठान’सारखी ब्लॉकबस्टर शाहरुखला दिली होती. त्यामुळे ‘किंग’ही बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करेल, अशी उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढली आहे. मुंबई विमानतळावरील व्हिडिओने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की शाहरुख खान केवळ सुपरस्टार नाहीत, तर नियमांचे पालन करणारे आणि सर्वांना आदराने वागवणारे एक शिस्तप्रिय नागरिक आहेत.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews