शरद केलकरचा धक्कादायक खुलासा; दमदार आवाजामुळेच काही भूमिका हातातून जात असल्याची कबुली

Published:
शरद यांनी सांगितले की त्यांचा आवाज अनेकांना त्यांची सर्वात मोठी ताकद वाटतो. मात्र, त्याच आवाजामुळे काही पात्रे मिळण्यात अडचणी निर्माण होतात. ते म्हणाले की, साध्या, सामान्य माणसाची भूमिका अनेक दिग्दर्शकांना त्यांच्या आवाजाशी सुसंगत वाटत नाही. त्यामुळे अशा भूमिका देताना ते हिचकिचतात
शरद केलकरचा धक्कादायक खुलासा; दमदार आवाजामुळेच काही भूमिका हातातून जात असल्याची कबुली

बॉलिवूड आणि मराठी मनोरंजन क्षेत्रात प्रभावी आवाज, दमदार उपस्थिती आणि वेगळ्या व्यक्तिरेखांसाठी ओळखले जाणारे अभिनेता शरद केलकर सध्या आपल्या नवीन मालिकेमुळे चर्चेत आहे. नेटफ्लिक्सवरील ‘तस्करी: द स्मगलर वेब’मध्ये त्यांनी साकारलेला नकारात्मक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. इमरान हाशमी मुख्य भूमिकेत असलेल्या या मालिकेत शरद केलकरचा ‘विलन अवतार’ विशेष गाजत आहे.

अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत शरद यांनी आपल्या करिअरबद्दल काही महत्त्वाचे अनुभव शेअर केले. ‘बाहुबली’च्या हिंदी डबिंगमधून त्यांना जेवढी लोकप्रियता मिळाली, तेवढेच आव्हानंही त्यांच्या समोर उभी राहिली आहेत, असे ते म्हणाले.

आवाजामुळे अनेक पात्रे गेली

शरद यांनी सांगितले की त्यांचा आवाज अनेकांना त्यांची सर्वात मोठी ताकद वाटतो. मात्र, त्याच आवाजामुळे काही पात्रे मिळण्यात अडचणी निर्माण होतात. ते म्हणाले की, साध्या, सामान्य माणसाची भूमिका अनेक दिग्दर्शकांना त्यांच्या आवाजाशी सुसंगत वाटत नाही. त्यामुळे अशा भूमिका देताना ते हिचकिचतात. या कारणामुळे काही चांगल्या व्यक्तिरेखा हातातून गेल्याचं शरद यांनी नमूद केलं.

ताज्या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारण्यामागचं कारण सांगताना ते म्हणाले की खलनायकाच्या व्यक्तिरेखांमध्ये अभिनयासाठी अधिक वाव असतो. अशा भूमिकांमध्ये निश्चित चौकट नसते आणि कलाकाराला विविध छटा दाखवण्याची संधी मोठ्या प्रमाणावर मिळते. त्यामुळे नकारात्मक भूमिका त्यांना नेहमीच आकर्षक वाटतात.

याआधीही निगेटिव्ह भूमिका

शरद याआधीही अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या नेगेटिव्ह भूमिका साकारल्या आहेत. ‘1920: इव्हिल रिटर्न्स’, ‘भूमी’, ‘ऑपरेशन रोमियो’, ‘हाउसफुल 4’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांच्या या व्यक्तिरेखांना विशेष दाद मिळाली होती.

सध्या ‘तस्करी’मधील त्यांच्या भूमिकेमुळे त्यांचं नाव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलं आहे. आवाजासंदर्भातील आव्हानं असूनही शरद केलकर आपली अभिनयशैली आणि विविध भूमिका साकारण्याची क्षमता यामुळे प्रेक्षकांवर कायमची छाप टाकत आहेत.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews