Shashank Ketkar : मतदान करून बाहेर पडताच शशांक केतकरचा संताप; ठाण्यातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरून प्रशासनाला सवाल

Published:
दरम्यान, आज दिवसभरात अनेक कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर आपल्या कामाकडे रवाना झाले. परंतु शशांकचा हा व्हिडिओ मतदानापुरता मर्यादित न राहता स्वच्छता, प्रशासनाची जबाबदारी आणि नागरिकांनी अपेक्षित असलेल्या मूलभूत सुविधांवर मोठी चर्चा सुरू करतो आहे.
Shashank Ketkar : मतदान करून बाहेर पडताच शशांक केतकरचा संताप; ठाण्यातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरून प्रशासनाला सवाल

Shashank Ketkar : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर आज महापालिका निवडणुकीसाठी ठाण्यातील एका मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेला. सकाळीच तो शांतपणे रांगेत उभा राहून मतदानाचा हक्क बजावला. मात्र मतदान करून बाहेर येताच त्याच्या नजरेसमोर जे दृश्य आलं, त्याने त्याला अक्षरशः संतापायला लावलं.

नेमकं काय घडलं? Shashank Ketkar 

मतदान केंद्र म्हणून वापरण्यात आलेल्या एका इंटरनॅशनल स्कूलच्या प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला होता. शाळेच्या बाहेर प्लास्टिक, कचऱ्याच्या पिशव्या, ओला कचरा आणि खराब झालेल्या वस्तूंचा ढीग पाहून शशांकने तेथेच मोबाईल काढून परिस्थितीचा व्हिडिओ तयार केला. त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यापासून नागरिकांमध्ये याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.

शशांकने व्हिडिओ शेअर केला

शशांकने व्हिडिओ शेअर करत विचारले की, आपण ज्या ठिकाणी लोकशाहीचे कर्तव्य पार पाडतो, त्याच ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती असेल तर नागरिकांनी काय म्हणावे? अशा महत्त्वाच्या दिवशी स्वच्छतेकडे इतकी दुर्लक्ष का होते, असा प्रश्नही त्याने उपस्थित केला. Shashank Ketkar

केवळ प्रश्न उपस्थित करून तो थांबला नाही. त्याने ठाण्यातील अनेक लोकप्रतिनिधींना या पोस्टमध्ये टॅग केले आहे. कोणत्याही पक्षाचा उमेदवार निवडून आला तरी स्वच्छतेसारख्या मूळ समस्यांवर ठोस काम होणार की नाही, याबाबतही त्याने शंका व्यक्त केली. ही नाराजी भावनिक नसून वास्तविक परिस्थितीतून येत असल्याचंही त्याने कॅप्शनमध्ये नमूद केलं.

नागरिकांनी शशांकच्या या पोस्टला मोठा प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी स्वतःच्या परिसरातही अशीच परिस्थिती असल्याचे सांगत फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. ठाणे महापालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले असल्याचं नागरिकांचे म्हणणे आहे.