Shraddha Kapoor Marriage : श्रद्धा कपूरच्या लग्नाच्या चर्चेला पुन्हा उधाण आले असून यावेळी वातावरण आणखी तापलंय. बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर उदयपुरात लग्न करणार, अशा जोरदार अफवा पसरल्या आहेत. तिचं नाव पुन्हा एकदा तिच्या कथित बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत जोडले जात आहे. नुकत्याच आलेल्या रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की श्रद्धा लवकरच उदयपुरमध्ये सात फेरे घेणार आहे. पण या सर्व चर्चांवर तिचे भाऊ सिद्धांत कपूर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर चाहत्यांमध्ये नवीन चर्चांना सुरुवात झाली आहे.
कुठून झाली चर्चांना सुरुवात (Shraddha Kapoor Marriage)
सोशल मीडियावर एका पेजने श्रद्धाच्या लग्नाबद्दल माहिती देत पोस्ट टाकली होती. यात असा दावा करण्यात आला की ‘स्त्री’ फेम श्रद्धा कपूर लवकरच राहुल मोदीसोबत विवाहबद्ध होणार आहे. ही पोस्ट व्हायरल होत असतानाच सिद्धांत कपूर या अफवेवर प्रतिक्रिया देत म्हणाले, “ही तर माझ्यासाठीही नवीन बातमी आहे.” त्यांच्या या उत्तरामुळे सध्या चाहत्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच श्रद्धा कपूरने एका लाइव्ह सेशनदरम्यान फॅन्ससोबत संवाद साधला होता. त्यात एका फॅनने तिला थेट प्रश्न केला की ती लग्न कधी करणार? यावर श्रद्धाने हसत उत्तर दिलं होतं, “मी करीन, लग्न करेन.” तिच्या या साध्या उत्तरामुळेच लग्नाच्या चर्चेला पुन्हा खतपाणी मिळालं. (Shraddha Kapoor Marriage)
2023 मध्ये राहुल – श्रद्धा ची भेट
श्रद्धा आणि राहुल मोदीच्या नात्याबद्दल बोलायचे झाले तर दोघांची भेट 2023 मध्ये ‘तू झूठी मैं मक्कार’च्या सेटवर झाली होती. त्यानंतर दोघांना 2024 मध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये प्रथमच एकत्र पाहिलं गेलं. गेल्या दोन-तीन वर्षांपासून दोघेही एकमेकांच्या जवळ असल्याची चर्चा आहे.
श्रद्धाच्या वर्कफ्रंटकडे पाहिल्यास ती सध्या ‘ईथा’ या विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. यानंतर ती ‘नागिन’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. तर सध्या श्रद्धा कपूरचं लग्न होणार की नाही, हे स्पष्ट झालेलं नसून तिच्या भावाच्या प्रतिक्रियेमुळे चर्चेला अजूनच गती मिळालेली आहे. चाहत्यांना मात्र तिच्या आयुष्यातील या मोठ्या निर्णयाबद्दल अधिकृत घोषणेचीच प्रतीक्षा आहे






