Welcome 3 Teaser : अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित कॉमेडी-ऍक्शन एंटरटेनर ‘वेलकम 3’ म्हणजेच ‘वेलकम टू द जंगल’चा नवा प्रोमो अखेर समोर आला आहे. हा प्रोमो पाहताच प्रेक्षकांचं लक्ष त्यातील तगड्या स्टारकास्टकडे वेधलं गेले. एवढी मोठी कलाकारांची फौज असल्याने पहिल्याच नजरेत अक्षय कुमारला ओळखणे सुद्धा कठीण जाणार, अशी चाहत्यांची प्रतिक्रिया आहे.
आज क्रिसमसच्या दिवशी अक्षय कुमारने हा खास प्रोमो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आणि चित्रपटाच्या रिलीजविषयीही मोठा अपडेट दिला. 2007 मध्ये सुरू झालेल्या सुपरहिट ‘वेलकम’ फ्रँचायझीचा हा तिसरा भाग असून प्रेक्षकांना याची दीर्घकाळपासून प्रतीक्षा होती. Welcome 3 Teaser
भव्य मल्टीस्टारर कास्टची झलक (Welcome 3 Teaser)
‘वेलकम टू द जंगल’ ही प्रचंड मोठ्या स्टारकास्टची फिल्म आहे. नव्या प्रोमोमध्ये अक्षय कुमारसोबत सुनील शेट्टी, परेश रावल, रवीना टंडन, दिशा पाटनी, जॉनी लीवर, अरशद वारसी, आफताब शिवदासानी, तुषार कपूर, जैकलीन फर्नांडिस, पुनीत इस्सर, मुकेश तिवारी आणि दयाशंकर पांडे यांसारखे कलाकार दिसत आहेत.
प्रोमोमध्ये कोणताही संवाद नाही, मात्र एक इमोशनल बॅकग्राउंड ट्यून ऐकू येते आणि सर्व कलाकार हातात शस्त्रे घेऊन अॅक्शनच्या मोडमध्ये दिसत आहेत. या फ्रँचायझीतला हा सर्वात मोठा आणि भव्य भाग असेल, अशी चर्चा जोरात आहे.
कधी येणार थिएटरमध्ये?
अक्षय कुमारने टिझर पोस्ट करत लिहिले की, “वेलकम टू दि जंगलच्या आमच्या मोठ्या टीमकडून तुम्हा सर्वांना क्रिसमसच्या शुभेच्छा. 2026 मध्ये हा चित्रपट सिनेमा गृहांमध्ये येईल. इतक्या मोठ्या प्रोजेक्टचा भाग मी कधीच नव्हतो. आम्ही सर्वजण तुम्हाला हा खास भेटवस्तू देण्यासाठी उत्सुक आहोत. चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. टीमने खूप मेहनत घेतली आहे.”
या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले असून ज्योती देशपांडे आणि फिरोज नाडियाडवाला हे निर्माते आहेत. उपलब्ध माहितीनुसार ‘वेलकम टू द जंगल’ वर्ष 2026 मध्ये भव्य प्रमाणात रिलीज होणार आहे.





