बजेट जाहीर होताच सर्वसामान्यांची नजर सर्वप्रथम काय महागलं आणि काय स्वस्त झालं याकडे जाते. विशेषतः दारू आणि सिगारेटसारख्या उत्पादनांवर चर्चा अधिक रंगते. यंदाही बजेट 2026 मध्ये करण्यात आलेल्या करबदलांनंतर दारूच्या किमती वाढणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे आता 1000 रुपयांची बाटली कितीला मिळणार आणि याचा सामान्य माणसाच्या खिशावर किती परिणाम होणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बजेट 2026 आणि महागाईचं नवं चित्र
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेत सलग नवव्यांदा केंद्रीय बजेट सादर केलं. बजेट 2026 मध्ये काही वस्तू स्वस्त झाल्या असल्या तरी अनेक गोष्टी महागल्या आहेत. त्यामध्ये दारू आणि सिगारेटसारखी उत्पादनेही समाविष्ट आहेत. बजेटमध्ये करण्यात आलेल्या कर आणि शुल्कविषयक बदलांमुळे दारूच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. देशात मद्यपान करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने या निर्णयाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे.
दारू महाग का झाली?
दारूवरील कर आकारणी हा विषय प्रामुख्याने राज्य सरकारांच्या अखत्यारित येतो. मात्र बजेटमध्ये टॅक्स कलेक्शन आणि इतर शुल्कांबाबत घेतलेल्या निर्णयांचा थेट परिणाम दारूच्या किमतींवर होतो. बजेट 2026-27 मध्ये दारू स्क्रॅप आणि खनिजांच्या विक्रीवर टॅक्स कलेक्टेड अॅट सोर्स (TCS)चा दर 1 टक्क्यांवरून 2 टक्के करण्यात आला आहे. याशिवाय राज्य सरकारांकडून एक्साइज ड्युटीत बदल होण्याचीही शक्यता असते, ज्यामुळे किरकोळ दर वाढतात.
आता 1000 रुपयांची बाटली कितीला मिळणार?
सोप्या शब्दांत सांगायचं झालं, तर 1000 रुपयांची दारूची बाटली आता प्रत्येक राज्यात एकाच किमतीत मिळणार नाही. कर आणि एक्साइज ड्युटीचे दर राज्य सरकार ठरवत असल्याने काही ठिकाणी 50 ते 100 रुपयांची वाढ होऊ शकते, तर काही राज्यांमध्ये यापेक्षाही जास्त वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजेच जी बाटली आधी 1000 रुपयांना मिळत होती, ती आता अंदाजे 1050 ते 1100 रुपये किंवा त्याहून अधिक किमतीत विकली जाऊ शकते. मात्र अंतिम दर राज्याच्या नियमांवर अवलंबून असेल.
दारू शौकिनांच्या खिशावर परिणाम
देशात दारू पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे किमती वाढल्याचा थेट फटका ग्राहकांच्या खिशाला बसणार आहे. जे लोक नियमितपणे दारू खरेदी करतात, त्यांच्या मासिक खर्चात वाढ होणे निश्चित आहे. तज्ज्ञांच्या मते, जर दारूच्या खपात मोठी घट झाली नाही, तर सरकारच्या महसुलात वाढ होण्याची शक्यता आहे, कारण करातून मिळणारे उत्पन्न वाढेल.
सिगारेट आणि तंबाखूही महाग
बजेट 2026 मध्ये केवळ दारूच नाही, तर सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादनेही महाग झाली आहेत. सिगारेटवरील कर आणि एक्साइज ड्युटी वाढवण्यात आली आहे. नव्या नियमांनुसार सिगारेटवर सुमारे 40 टक्के जीएसटीसह अतिरिक्त सेस आणि एक्साइज शुल्क आकारले जात आहे. तसेच प्रति स्टिक शुल्कही लागू करण्यात आले आहे. याचा थेट परिणाम असा होणार आहे की सिगारेट ओढणाऱ्यांना आधीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
बीडीला थोडा दिलासा, पण सिगारेट महाग
जिथे सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादनांच्या किमती वाढल्या आहेत, तिथे बीडीच्या किमतींमध्ये तुलनेने दिलासा देण्यात आला आहे. लहान स्तरावर काम करणाऱ्या कामगारांना आणि उद्योगाला नुकसान होऊ नये, हा यामागचा उद्देश मानला जात आहे. मात्र आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोणत्याही प्रकारचा तंबाखू आरोग्यास अपायकारकच असतो.





