Mon, Dec 29, 2025

Jio Recharge Plans : Jio चा परवडणारा रिचार्ज; 91 रुपयांत 28 दिवसांची व्हॅलिडीटी

Published:
एअरटेल वोडाफोन आयडिया यांसारखे टेलीफोन कंपनीच्या तुलनेत जियो चे रिचार्ज ग्राहकांना कमी दरात उपलब्ध होत असतात. आताही कंपनीने असाच एक स्वस्तात मस्त असा रिचार्ज प्लॅन आणलेला आहे.  देशातील मध्यमवर्गीय कुटुंबासाठी हा रिचार्ज जनू एक वरदान ठरतोय.
Jio Recharge Plans : Jio चा परवडणारा रिचार्ज; 91 रुपयांत 28 दिवसांची व्हॅलिडीटी

Jio Recharge Plans : देशातील आघाडीचे टेलिफोन कंपनी असलेली जिओ नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन लॉन्च करत असते. एअरटेल वोडाफोन आयडिया यांसारखे टेलीफोन कंपनीच्या तुलनेत जियो चे रिचार्ज ग्राहकांना कमी दरात उपलब्ध होत असतात. आताही कंपनीने असाच एक स्वस्तात मस्त असा रिचार्ज प्लॅन आणलेला आहे.  देशातील मध्यमवर्गीय कुटुंबासाठी हा रिचार्ज जनू एक वरदान ठरतोय. आणि दुसरी बाब म्हणजे एअरटेलला मोठा झटका बसतोय.

किती रुपयांचा रिचार्ज प्लॅन? Jio Recharge Plans

आम्ही तुम्हाला ज्या रिचार्ज प्लान बद्दल सांगत आहोत तो आहे जियोचा 91 रुपयांचा रिचार्ज प्लॅन.  या प्लॅनमध्ये ग्राहकांना तब्बल 28 दिवसाची मिळते म्हणजेच काय तर इकडे रिचार्ज केला की मग पुढचे 28 दिवस तुम्हाला कसलेही टेन्शन नसेल. यात कॉलिंग, डेटा आणि एसएमएससारखे फायदे मिळतात. जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये 3 जीबी डेटा मिळतो. पण, हा डेटा डेली बेसिस वर मिळणार आहे म्हणजेच एकाच वेळी तीन जीबी डेटा वापरता येणार नाही. कंपनी दररोज 100 एमबी डेटा देणार आहे. Jio Recharge Plans

फक्त जीओ फोनसाठी प्लॅन

शिवाय डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, वापरकर्त्यांना 64Kbps च्या वेगाने डेटा मिळेल. परंतु तुमच्या माहितीसाठी की हा जिओ प्लॅन सर्व वापरकर्त्यांसाठी नाही. तर, कंपनीने हा प्लॅन जिओफोन वापरकर्त्यांसाठी लाँच केला आहे. म्हणजे जर तुम्ही जिओ फोन युजर असाल तर या प्लॅनने रिचार्ज करू शकता. इतर मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांना हा रिचार्ज प्लॅन करता येणार नाही