अवघ्या 1,200 रूपयांच्या तिकिटात देशभरात विमानाने कुठेही फिरा; एअर इंडियाची खास ऑफर

Written by:Rohit Shinde
Published:
सणासुदीच्या काळात विमान कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी काही खास ऑफर घेऊन येत असतात. एअर इंडियाने देखील आपल्या प्रवाशांसाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे.
अवघ्या 1,200 रूपयांच्या तिकिटात देशभरात विमानाने कुठेही फिरा; एअर इंडियाची खास ऑफर

सणासुदीच्या काळात प्रवासी देशांतर्गत पर्यटनासाठी विमान प्रवासाचा आधार घेत असतात. त्यामध्ये आणखी एक महत्वपूर्ण बातमी समोर येत आहे. सणासुदीच्या काळात विमान कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी काही खास ऑफर घेऊन येत असतात. एअर इंडियाने देखील आपल्या प्रवाशांसाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे. एअर इंडिया कंपनीने नुकताच पे डे सेलची घोषणा केली असून यांतर्गत प्रवाशांना देशातंर्गत आणि आंतरराष्ट्रीय या दोन्ही प्रवासासाठी तिकीटात मोठी सूट मिळणार आहे. देशांतर्गत प्रवासासाठी तिकीटाचे 1200 रुपयांपासून आहेत, तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी तिकीटाचे दर 3724 रुपयांपासून सुरू होते.

एअर इंडियाची मोठी भन्नाट ऑफर

कंपनीने ‘पे डे सेल’ची घोषणा केली असून या ऑफर अंतर्गत प्रवाशाना विमानाने फक्त 1200 रुपयांमध्ये देशांतर्गत प्रवास करता येणार आहे. या जबरदस्त ऑफरमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी विमान तिकिटांमध्ये मोठी सूट मिळणार आहे. या ऑफरमध्ये कमी किमतीत तिकीट मिळण्यासोबतच शून्य सुविधा शुल्कासह इतरही सुविधांचा साभ मिळणार आहे.

‘पे डे सेल’ मुळे प्रवाशांना तिकीट दरात मोठी सूट मिळणार आहे. देशांतर्गत प्रवासाचे दर 1200 रुपयांपासून सुरू होतात, तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी तुम्हाला 3724 रुपये इतकी किंमत मोजावी लागेल. तिकिटांची विक्री 27 सप्टेंबर रोजी एअरलाइनच्या मोबाइल ॲप आणि वेबसाइटवर सुरू झाली आहे. 28 सप्टेंबरपासून ती इतर सर्व बुकिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाली आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तिकीट बुकिंगची अंतिम तारीख 1 ऑक्टोबर आहे. हे लक्षात घ्या की या ऑफरनुसार 12 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत प्रवास करता येणार आहे.

प्रवाशांना मिळणारी चांगली सुविधा

प्रवाशांसाठी या सेलचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे शून्य सुविधा शुल्क (Zero Convenience Fee). प्रवाशांनी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या मोबाईल ॲपद्वारे तिकिटे बुक केली, तर त्यांना कोणत्याही प्रकारचे सुविधा शुल्क द्यावे लागणार नाही. याशिवाय चेक-इन बॅगेजवरही मोठ्या सवलती देण्यात आल्या आहेत. देशांतर्गत फ्लाइट्समध्ये 15 किलोपर्यंतच्या बॅगेजसाठी फक्त 1500 रुपये आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्समध्ये 20 किलोपर्यंतच्या बॅगेजसाठी 2500 रुपये इतके कमी शुल्क आकारले जाईल. हे सामान्य दरांपेक्षा खूपच कमी आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews