Ayurvedic remedies to relieve stress: बहुतांश लोक आपल्या शारीरिक आरोग्याची काळजी घेतात. पण, मानसिक आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतात. आजच्या धावपळीच्या जगात आणि कामाच्या ताणतणावात, स्वतःला तणावमुक्त आणि आनंदी ठेवणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.
जर तुमचे मन आणि मेंदू शांत नसेल तर तुम्ही कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. त्यामुळेच आज आपण आयुर्वेदातील काही महत्वाच्या पद्धती जाणून घेऊया. ज्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत.
तुमची दिनचर्या –
योग्य दिनचर्या ही आपल्या जीवनात संतुलन राखण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे. आयुर्वेदानुसार, सकाळी लवकर उठणे, थंड पाण्याने तोंड धुणे, ध्यान करणे, योग्य वेळी खाणे आणि लवकर झोपणे. या सर्व सवयी मनाला स्थिर आणि शांत करण्यास मदत करतात. जेव्हा आपले शरीर आणि मन योग्य दिनचर्याचे पालन करते तेव्हा अनावश्यक ताण आपोआप कमी होतो.
अभ्यंग –
आयुर्वेदात अभ्यंग किंवा तेल मालिश अत्यंत प्रभावी मानली जाते. ते केवळ शारीरिक थकवा दूर करत नाही तर मानसिक चिंता आणि अस्वस्थता देखील कमी करते. कोमट तीळ किंवा खोबरेल तेलाने दररोज हलक्या हाताने मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि मन आणि मेंदू रिलॅक्स होतो.
योग आणि व्यायाम –
दररोज योगा आणि हलकाफुलका व्यायाम करणे हा मानसिक त्रास कमी करण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे. योगासने आणि प्राणायाम मज्जासंस्था शांत करतात. तणाव संप्रेरक कमी करतात आणि सकारात्मकता वाढवतात.
जीभ स्वच्छ करणे –
जीभ स्वच्छ करणे हे एक छोटे काम वाटू शकते, परंतु आयुर्वेदात त्याचे खूप महत्त्व आहे. जिभेवर साचलेले विषारी पदार्थ केवळ शारीरिक आरोग्याला हानी पोहोचवत नाहीत तर मानसिक थकवा आणि अस्वस्थता देखील निर्माण करतात. सकाळी तांबे किंवा स्टीलच्या स्क्रॅपरने जीभ स्वच्छ केल्याने तोंड स्वच्छ होतेच, शिवाय मनही हलके होण्यास मदत होते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





