सरकारच्या निर्णयानुसार पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं आवश्यक आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलं नाही तर तुमचं पॅन कार्ड 1 जानेवारी 2026 पासून निष्क्रिय केलं जाईल. सरकरानं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 निश्चित केली आहे. या नियमामुळं जर तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय झालं तर आर्थिक कामं अडकू शकतात. त्यामुळे तुम्ही वेळीच हालचाली करत ही प्रक्रिया पूर्ण करून घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
31 डिसेंबर पूर्वी PAN-AADHAR लिंक आवश्यक
सरकारने पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम मुदत जाहीर केली आहे, जी चुकवल्यास तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. यामुळे आयकर रिटर्न भरणे, बँक व्यवहार आणि कर्ज घेण्यासारख्या अनेक आर्थिक कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. आजच ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर १ जानेवारीपासून तुमची अनेक सरकारी व आर्थिक कामे अडकू शकतात. इतकंच नाही तर विविध योजनांचा लाभही मिळणार नाही. आजच्या काळात आधार आणि पॅन कार्ड ही अत्यावश्यक कागदपत्रे बनली आहेत. बँक खाते उघडणे, आयकर भरणे, कर्ज घेणे किंवा कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करायचा असेल, तर पॅन कार्डशिवाय पर्याय नाही. मात्र, जर तुमचे पॅन कार्ड अद्याप आधारशी लिंक नसेल, तर आता वेळ फारच कमी उरली आहे. आजकाल प्रत्येक आर्थिक कामात पॅन कार्ड आणि आधार कार्ड आवश्यक असतं. त्यामुळे ही प्रक्रीया पूर्ण करून घ्या.
PAN–Aadhaar लिंक कसं करायचं ?
यासाठी कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. मोबाईल किंवा लॅपटॉपवरून हे काम सहज करता येते.
इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाईटवर जा – incometax.gov.in
Home Page वरील Quick Links मध्ये Link Aadhaar वर क्लिक करा
PAN नंबर आणि Aadhaar नंबर टाका
मोबाईलवर आलेला OTP टाकून व्हेरिफिकेशन पूर्ण करा
SMS द्वारेही लिंक करता येते, पण ऑनलाइन पद्धत अधिक सोपी आणि सुरक्षित आहे.
पॅन आणि आधार लिंक करणे का आवश्यक ?
पॅन (PAN) आणि आधार लिंक करणे आवश्यक असण्यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत. सरकारने करप्रणाली अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी ही अट लागू केली आहे. पॅन-आधार लिंक केल्यामुळे एका व्यक्तीकडे एकच ओळख राहते आणि बनावट पॅन कार्ड, दुहेरी नोंदी तसेच करचुकवेगिरीला आळा बसतो. पॅन-आधार लिंक नसल्यास पॅन कार्ड निष्क्रिय (Inactive) होऊ शकते. त्यामुळे आयकर विवरणपत्र (ITR) भरणे, बँक खाते उघडणे, मोठे आर्थिक व्यवहार, शेअर्स-म्युच्युअल फंड गुंतवणूक यांसारखी कामे अडचणीत येऊ शकतात. तसेच कर परतावा मिळण्यातही अडथळे येऊ शकतात. म्हणून प्रत्येक करदात्यासाठी पॅन आणि आधार लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे.





