Raj Uddhav Alliance । मुंबईत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची घोषणा अखेर आज जाहीर झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत संपूर्ण महाराष्ट्राला ब्रेकिंग न्यूज दिली आहे. संजय राऊत यांच्या ट्विटनुसार उद्या दुपारी १२ वाजता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतिचीबी घोषणा होऊ शकते. त्यामुळे मराठी माणसासाठी, मुंबईकरांसाठी आणि शिवसेना- मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी उद्याचा दिवस अतिशय भावनिक आणि तेवढाच आनंदाचा असेल.
राऊतांचे ट्विट नेमकं काय? Raj Uddhav Alliance
संजय राऊत यांनी त्यांच्या सोशलं मीडियावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो शेअर केला आहे. यावेळी त्या दोघांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असून राज ठाकरे उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देत असल्याचे दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना संजय राऊत यांनी उद्या १२ वाजता इतकंच म्हटलं आहे. याचा अर्थ उद्या दुपारी १२ वाजता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची घोषणा होणार आहे. तब्बल २० वर्षानंतर राज आणि उद्धव ठाकरे निवडणुकीत एकत्र दिसतील. मराठी माणसासाठी, महारष्ट्रासाठी आणि मुंबई वाचवण्यासाठी आम्ही एकत्र येतोय असं दोन्ही पक्षाकडून यापूर्वीच सांगण्यात आलं होते. अखेर आज अधिकृतरीत्या ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांच्या ट्विटमुळे शिक्कामोर्तब झालं आहे. Raj Uddhav Alliance
कार्यकर्त्यांचे मनोमिलन आधीच झालं आहे –
दरम्यान, शिवसेना आणि मनसेची युती कार्यकर्त्यांनी युती स्वीकारली आहेत. कोणाच्या मनात संभ्रम नाही. तशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत. एकत्र येऊन सर्व कामाला लागले आहेत. मनोमिलन झालेलं असून जागावाटपवर काल रात्री शेवटचा हात फिरवला गेला, असं संजय राऊतांनी सांगितलं होतं. मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना १५० जागांच्या आसपास उमेदवार उभे करेल तर राज ठाकरेंच्या मनसेला ६५ ते ७० जागा मिळतील असं बोललं जात आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 2017 च्या निवडणुकीत जिंकलेल्या 12 ते 15 जागा राज ठाकरे यांच्या मनसेसाठी सोडल्या आहेत. या जागांवरील माजी नगरसेवक हे आता शिंदे गटात गेले आहेत. त्याठिकाणी उद्धव ठाकरेंकडे प्रभावी असा चेहरा नाही, तुलनेत या जागांवर मनसेकडे ताकदवान उमेदवार उपलब्ध आहेत. त्यामुळे या जागा मनसेला सोडण्यात आल्या आहेत





