Wed, Dec 24, 2025

1 जानेवारीपासून श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर बंद ! तीन महिने दर्शन का बंद राहणार ?

Written by:Rohit Shinde
Published:
भीमाशंकर मंदिर परिसराक अनेक डागडुजीची आणि विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे मंदिर परीसरातील दर्शन जवळपास तीन महिने बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
1 जानेवारीपासून श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर बंद ! तीन महिने दर्शन का बंद राहणार ?

महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर मंदिराबाबत भाविकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मंदिर परिसरात होणाऱ्या विकासकामांमुळे 1 जानेवारी पासून पुढील तीन महिने मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे ख्रिसमस किंवा नवीन वर्षात दर्शनाची योजना करणाऱ्यांनी ही सूचना लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

3 महिने भीमाशंकर दर्शन बंद राहणार !

महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर मंदिराबाबत भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. देशभरातून दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येणारे हे पवित्र मंदिर 1 जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिने दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. मंदिर परिसरात प्रस्तावित विकासकामे आणि भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पौराणिक कथा नेमकी काय ?

त्रिपुरासूर नावाचा एक राक्षस होता, जो खूप बलवान होता. त्याने देवांना आणि ऋषींना खूप त्रास दिला होता. त्यामुळे, सर्व देव आणि ऋषींनी भगवान शंकराकडे मदत मागितली. देवादिकांच्या प्रार्थनेला मान देऊन भगवान शंकरांनी भीमाशंकर येथे त्रिपुरासुराचा वध केला, असे सांगितले जाते. यानंतर, भगवान शंकर या ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले, असे मानले जाते. 

भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे महत्त्व 

श्रावण महिन्यात भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला भेट देणे खूप शुभ मानले जाते. भीमाशंकर हे भगवान शंकराचे एक महत्वाचे ज्योतिर्लिंग आहे आणि श्रावण महिन्यात येथे दर्शनासाठी मोठी गर्दी होते. भीमाशंकर हे भगवान शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. त्यामुळे याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. भीमाशंकर मंदिर एक शक्तिशाली ऊर्जा केंद्र मानले जाते. येथे आल्यावर भक्तांना शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळते.