Thu, Dec 25, 2025

Eknath Shinde : राज- उद्धव युतीनंतर शिंदे ॲक्शन मोडमध्ये; घेतला मोठा निर्णय

Published:
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठा निर्णय घेतलाय. एकनाथ शिंदेंकडून 40 स्टार प्रचारकांची घोषणा करण्यात आली आहे. हे नेते सर्व महानगरपालिका परिसरात जाऊन पक्षाचा प्रचार करतील
Eknath Shinde : राज- उद्धव युतीनंतर शिंदे ॲक्शन मोडमध्ये; घेतला मोठा निर्णय

Eknath Shinde : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठा निर्णय घेतलाय. एकनाथ शिंदेंकडून 40 स्टार प्रचारकांची घोषणा करण्यात आली आहे. हे नेते सर्व महानगरपालिका परिसरात जाऊन पक्षाचा प्रचार करतील. यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे, रामदास कदम, श्रीकांत शिंदे, नीलम गोरे, गजानन कीर्तिकर यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे

शिंदे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी (Eknath Shinde)

एकनाथ शिंदे ,मुख्य नेते व उप-मुख्यमंत्री
रामदास कदम, नेते
गजानन कीतीकर, नेते
आनंदराव अडसूळ, नेते
डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे, खासदार आणि शिवसेना संसदीय गट नेते
प्रतापराव जाधव, केंद्रीय मंत्री
डॉ.निलमताई गोन्हे, नेत्या
मिनाताई कांबळी, नेत्या
गुलाबराव पाटील, नेते व मंत्री
दादाजी भुसे, उपनेते व मंत्री
उदय सामंत, उपनेते व मंत्री
शंभूराज देसाई, उपनेते व मंत्री
संजय राठोड, मंत्री
संजय शिरसाट, प्रवक्ते व मंत्री
भरतशेठ गोगावले, उपनेते व मंत्री
प्रकाश आबिटकर, मंत्री
प्रताप सरनाईक, मंत्री
आशिष जयस्वाल, राज्यमंत्री
योगेश कदम, राज्यमंत्री
दिपक केसरकर, प्रवक्ते व आमदार
श्रीरंग बारणे, उपनेते व खासदार
धैर्यशील माने, खासदार
संदीपान भुमरे, खासदार
नरेश म्हस्के, खासदार
रवींद्र वायकर, खासदार
मिलिंद देवरा, खासदार
दिपक सावंत, उपनेते व माजी मंत्री
शहाजी बापू पाटील, उपनेते व माजी आमदार
राहुल शेवाळे, उपनेते व माजी खासदार
मनिषा कायंदे, सचिव व आमदार
निलेश राणे, आमदार
संजय निरुपम, प्रवक्ते
राजू वाघमारे, प्रवक्ते
ज्योती वाघमारे, प्रवक्ते
पूर्वेश सरनाईक, युवासेना कार्यध्यक्ष
राहुल लोंढे, युवसेना सचिव
अक्षयमहाराज भोसले, शिवसेना प्रवक्ते व अध्यक्ष, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना
समिर काझी, कार्याध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग
शायना एन.सी., राष्ट्रीय प्रवक्त्या
गोविंदा अहुजा, माजी खासदार

टायमिंग साधलं

एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची घोषणा आज झाली असताना, दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आपल्या 40 स्टार प्रचारकांची यादी ही आजच जाहीर केली. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे एकनाथ शिंदेंना महापालिका निवडणुकीत फटका बसेल असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी आजच आपल्या 40 शिलेदारांची घोषणा करून अचूक टाइमिंग साधल्याचे बोलले जाते.