Indian Railways : पुणेकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. पुण्यातून एक विशेष एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे जी थेट उत्तर प्रदेशात पोहचेल. ही रेल्वे अहिल्यानगर वरुन जाणार आहे. त्यामुळे नगरच्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. ही रेल्वे कधीपासून सुरू होईल? तिचे वेळापत्रक कसं असेल आणि ती कोणकोणत्या स्थानकावर थांबेल याची माहिती आज आपण जाणून घेऊयात.
रेल्वे प्रशासनाकडून हिवाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पुणे ते प्रयागराज दरम्यान ही विशेष एकमार्गी रेल्वेगाडी सुरू केली जाणार आहे. यामुळे पुणे ते प्रयागराज दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. ही गाडी अहिल्यानगर कोपरगाव तसेच उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबेल.
गाडीचे वेळापत्रक कसे राहणार? Indian Railways
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते प्रयागराज ही विशेष ट्रेन 27 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजून 55 मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि 29 डिसेंबरला प्रयागराजला पोहचेल. तसेच 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:55 मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकातून दुसरी विशेष गाडी सोडली जाणार आहे. ही गाडी 2 जानेवारीला पहाटे दोन वाजून दहा मिनिटांनी प्रयागराज येथे पोहचेल. Indian Railways
कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा
पुणे ते प्रयागराज दरम्यान चालवली जाणारी एकमार्गी विशेष एक्सप्रेस ट्रेन हडपसर, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, अंकाई, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगणा लक्ष्मीबाई, ओरई, गोविंदपुरी व फतेहपुर या महत्त्वाच्या स्थानकावर थांबेल.





