Fri, Dec 26, 2025

Nashik Politics : ठाकरेंसाठी काल डान्स केला, अन् आज भाजपात गेला..; नाशिकमध्ये राजकारण पेटल

Published:
ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मनसे नेते दिनकर पाटील, यतीन वाघ आणि उबाठा गटाचे विनायक पांडे यांनी एकत्र येत जोरदार सेलिब्रेशन केले. पेढे वाटले गेले आणि विजयाचा गुलाल उधळत या नेत्यांनी डान्सही केला. नंतर जादूची कांडी अशी काही फिरली की हे तिन्ही नेते विरोधात असलेल्या भाजपमध्ये जाऊन बसले
Nashik Politics : ठाकरेंसाठी काल डान्स केला, अन् आज भाजपात गेला..; नाशिकमध्ये राजकारण पेटल

Nashik Politics : सध्याच्या राजकीय परिस्थितीत कोणता नेता कधी कोणत्या पक्षात जाईल कधी कोणाचा झेंडा हातात घेईल हे सांगणं सर्वात कठीण काम आहे. सकाळी एका पक्षाचा प्रचार करून संध्याकाळी दुसऱ्या पक्षात जाणारे अनेक दल बदलू मागच्या अनेक वर्षात आपण महाराष्ट्रात पाहतोय. असाच प्रकार काल नाशिकमध्ये घडला. ठाकरे बंधू एकत्र आल्याने नाशिक मधील मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका नेत्यांनी काल पेढे वाटले, डान्स केला. अन् मग नंतर तेच नेते चक्क भाजपात गेला.

नेमक काय घडलं? Nashik Politics

ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मनसे नेते दिनकर पाटील, यतीन वाघ आणि उबाठा गटाचे विनायक पांडे यांनी एकत्र येत जोरदार सेलिब्रेशन केले. पेढे वाटले गेले आणि विजयाचा गुलाल उधळत या नेत्यांनी डान्सही केला. नंतर जादूची कांडी अशी काही फिरली की हे तिन्ही नेते विरोधात असलेल्या भाजपमध्ये जाऊन बसले. भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत या तिन्ही नेत्यांनी कमळ हाती घेतलं. Nashik Politics

भाजपा आमदाराचा विरोध झुगारुन पक्षप्रवेश (Nashik Politics)

सगळा क्लायमॅक्स इथेच संपत नाही खरा ट्विष्ट तर याच्या पुढे घडतो. दिनकर पाटील, यतीन वाघ आणि विनायक पांडे यांच्या पक्षप्रवेशाला भाजपच्या स्थानिक आमदार देवयानी फरांदे यांनी तीव्र विरोध केला. फरांदे यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी या पक्षप्रवेशाला विरोध करण्यासाठी मोठी गर्दी केली आणि फरांदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रवेशाचा निषेध केला आणि आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचे सांगितले. मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देवयानी फरांदे यांच्या विरोधाला जुगारून या तिन्ही नेत्यांना पक्षात घेतलं.

या एकूण संपूर्ण घटनाक्रमानंतर देवयानी परांदे पुरत्या भावूक झाल्या. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांचे डोळे पाण्याने भरले होते. त्या म्हणाल्या, आपल्यावर अन्याय झाला असला तरी आपण कधी जाहीर भूमिका घेतली नाही, असं सांगताना त्या भावुक झाल्या. मी पक्षाची निष्ठावंत कार्यकर्ती आहे. फेसबुकवर माझं मत मांडलं. मी सामान्य कार्यकर्ती आहे, त्यामुळे डोळ्यांसमोर कार्यकर्त्यांचा बळी जात असेल तर ते योग्य नाही.