Fri, Dec 26, 2025

Prashant Jagtap : पवारांची साथ सोडल्यानंतर प्रशांत जगताप या पक्षात जाणार?? चर्चांना उधाण

Published:
प्रशांत जगताप हे धडाडीचे नेते आहेत त्यांना पुण्यातील प्रश्नांचे चांगली जाण आहे. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या राजकीय पक्षांची ऑफर येणे साहजिकच आहे. मात्र प्रशांत जगताप नेमक्या कोणत्या पक्षात जाऊ शकतात याबाबत महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत
Prashant Jagtap : पवारांची साथ सोडल्यानंतर प्रशांत जगताप या पक्षात जाणार?? चर्चांना उधाण

Prashant Jagtap : पुणे महापालिका निवडणुकीत शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतायेत असे चित्र दिसताच शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यांनंतर शरद पवार गटात मोठी खळबळ उडाली. यानंतर प्रशांत जगताप नेमक्या कोणत्या पक्षाचा नाही या चर्चांना उधाण आलं. प्रशांत जगताप हे धडाडीचे नेते आहेत त्यांना पुण्यातील प्रश्नांचे चांगली जाण आहे. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या राजकीय पक्षांची ऑफर येणे साहजिकच आहे. मात्र प्रशांत जगताप नेमक्या कोणत्या पक्षात जाऊ शकतात याबाबत महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत.

काँग्रेस मध्ये जाण्याची शक्यता (Prashant Jagtap)

सूत्रांच्या माहितीनुसार प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते. एकीकडे काँग्रेसची पुणे महापालिकेबाबत महत्त्वाची बैठक सुरू असतानाच प्रशांत जगताप हे पुण्यातून मुंबईकडे रवाना झाले असल्याचे सांगितले जात आहे. प्रशांत जगताप यांच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्या असल्याच्या वृत्ताला काँग्रेसच्या काही नेत्यांनी देखील दुजोरा दिला आहे. प्रशांत जगताप यांच्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने फिल्डिंग लावली होती. मात्र जगताप हे ठाकरे गटाऐवजी काँग्रेसचा पर्याय निवडतील हे जवळपास निश्चित मानले जाते. Prashant Jagtap

पक्ष सोडताना काय म्हणाले होते जगताप

27 वर्षांपूर्वी मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा कुठल्या पदासाठी नव्हे, तर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी मी कार्यरत झालो. आज 27 वर्षांनंतरही हेच एकमेव ध्येय माझ्या मनात आहे. यापुढेही पुरोगामी विचारांसाठी माझी सामाजिक व राजकीय वाटचाल सुरूच असेल असे जगताप म्हणाले होते. त्यांच्या या विधानातूनच ही गोष्ट स्पष्ट होते की ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. मी राजकारणातून बाहेर गेलो नाही. नगरसेवक पदाची निवडणूक मी लढवणार असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले.