नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. 25 डिसेंबरपासून या विमानतळाहून व्यवयायिक उड्डाणांना सुरुवात होत असून पहिल्याच दिवशी 30 उड्डाणं होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या विमानतळाहून पहिल्या टप्प्यात इंडिगो, एअर इंडिया, आकासा आणि स्टार एअर या विमान कंपन्या सेवा देणार आहेत. नवी मुंबई विमानतळाहून सुरुवातीच्या टप्प्यात इंडिगो, एअर इंडिया, आकासा आणि स्टार एअर या कंपन्या विमान सेवा देणार आहे.
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अनेक वर्षांची प्रतीक्षा, नियोजन आणि प्रयत्नांनंतर प्रत्यक्ष सेवेत दाखल होत आहे. एक ऐतिहासिक पर्व उद्यापासून सुरू होणार आहे. देशातील अत्याधुनिक ग्रीनफिल्ड विमानतळ म्हणून विकसित झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 25 डिसेंबर 2025 पासून अधिकृतपणे उड्डाणांना सुरुवात होणार आहे. सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी याला महाराष्ट्र शासन आणि सिडकोच्या पायाभूत सुविधा विकासातील बांधिलकीचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे.
पहिल्याच दिवशी या विमानतळावरून एकूण 30 एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्स (ATMs) होणार असून ही संख्या नव्या विमानतळासाठी मोठी सुरुवात मानली जात आहे. इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, आकासा एअर आणि स्टार एअर या प्रमुख विमान कंपन्या पहिल्या दिवशीच सेवा देणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना विविध शहरांशी थेट हवाई जोडणी मिळणार आहे.
प्रवाशांसाठी अनेक सोयी आणि सुविधा
विमानतळाची क्षमता दरवर्षी २ कोटी प्रवाशांना हाताळण्याची असेल. इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्सप्रेस सारख्या अनेक एअरलाइन सहयोगी कंपन्यांनी नवी मुंबई विमानतळावरून देशांतर्गत उड्डाणे चालविण्यास रस दर्शविला आहे. देशांतर्गत उड्डाणे सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी, तात्पुरत्या स्वरूपात २०२६ च्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होण्याची शक्यता आहे.
- नवी मुंबई विमानतळाचे बांधकाम पाच टप्प्यात करण्याचे नियोजन आहे. अधिकाऱ्यांच्या मते, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची अंतिम क्षमता दरवर्षी ९० दशलक्ष प्रवाशांची असेल.
- विमानतळावर अति-जलद सामान हाताळणी प्रणालीचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य असेल. वाढीव वेग आणि अचूकतेसाठी ही प्रणाली ३६०-अंश बारकोड स्कॅनिंग वापरेल.
- सामान्य माल, औषध आणि नाशवंत वस्तूंसाठी एक नवीन विशेष एअर कार्गो टर्मिनल बांधले जात आहे. टर्मिनलमध्ये तापमान-नियंत्रित गोदामे आणि उच्च-तंत्रज्ञान स्वयंचलित हाताळणी प्रणालींचा समावेश असेल, ज्यामुळे एनएमआयए पश्चिम आणि मध्य भारतासाठी एक प्रमुख मालवाहतूक प्रवेशद्वार बनेल.





