Thu, Dec 25, 2025

Indian Airlines : IndiGo ला दणका!! सरकारकडून 2 नव्या एअरलाइन्सला मान्यता

Published:
सध्या देशांतर्गत विमानप्रवास करणाऱ्या सुमारे 90 टक्के प्रवाशांकडून इंडिगो आणि टाटा समूहाच्या (एअर इंडिया) सेवांचा वापर केला जातो. अशावेळी एका मोठ्या एअरलाईनमध्ये अडचण निर्माण झाली, तर संपूर्ण व्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो
Indian Airlines : IndiGo ला दणका!! सरकारकडून 2 नव्या एअरलाइन्सला मान्यता

Indian Airlines: देशांतर्गत विमान वाहतूक कंपनी इंडिगो ला सरकारने दणका दिला आहे. मागील काही दिवसांपूर्वी इंडिगोच्या विमानसेवा देशभरात बंद होत्या. अनेक विमानांची उड्डाणे अचानकपणे रद्द झाल्याने लाखो प्रवाशांना मोठा फटका बसला होता. देशांतर्गत विमान वाहतूकमध्ये इंडिगोचा वरचष्मा असतो, मात्र याच कंपनीमुळे सरकारला टीका सहन करावी लागली होती. आता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेत इंडिगोला धक्का दिला आहे.

इंडिगोची एकाधिकारशाही रोखणार (Indian Airlines)

सध्या देशांतर्गत विमानप्रवास करणाऱ्या सुमारे 90 टक्के प्रवाशांकडून इंडिगो आणि टाटा समूहाच्या (एअर इंडिया) सेवांचा वापर केला जातो. अशावेळी एका मोठ्या एअरलाईनमध्ये अडचण निर्माण झाली, तर संपूर्ण व्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो हे देशाचे मागच्या महिन्यात अनुभवले. त्यामुळे इथून पुढे असा प्रकार घडू नये यासाठी सरकारने 2 नव्या एअरलाइन्सला मान्यता दिली आहे. मार्केट मधील एकाधिकार कमी करून प्रवाशांना अधिक पर्याय देणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे.

नव्या एअरलाईन्स कोणत्या?

अल हिंद एअर – केरळस्थित अलहिंद ग्रुपची ही कंपनी असून, हा समूह आधीपासूनच ट्रॅव्हल आणि टुरिझम क्षेत्रात सक्रिय आहे.

फ्लाय एक्सप्रेस – हैदराबादस्थित ही कंपनी असून, कुरिअर आणि कार्गो सेवांचा अनुभव तिच्या पाठीशी आहे.

याशिवाय, शंख एअर या आणखी एका एअरलाईनला यापूर्वीच एनओसी मिळाली आहे. शंख एअर उत्तर प्रदेशातील लखनऊ, वाराणसी, आग्रा आणि गोरखपूर यांसारख्या शहरांना जोडण्याची योजना आखत आहे.