नवी दिल्ली – टोलमुळे हैराण असलेल्या देशवासियांना केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा करत दिलासा दिला आहे. केंद्र सरकारच्या वतीनं फास्टटॅगसाठी वार्षिक पास योजना जाहीर केली आहे. 15 ऑगस्टपासून यायोजनेचा लाभ खासगी वाहनचालकांना घेता येणार आहे.
देशातील राष्ट्रीय महामार्गांवर या पासचा उपयोग करता येणार आहे. कार, जीप, व्हॅन अशा लहान खासगी वाहनांना याचा फायदा होणार असून, केवळ 3 हजार रुपयांत हा वार्षिक पास काढता येईल. या पासद्वारे राष्ट्रीय महामार्गांवर 200 फेऱ्या करण्याची मुभा वाहनधारकांना असणार आहे.
हे ही वाचा
हा पास कसा मिळेल?
राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना या पासचा मोठा लाभ होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या वतीनं यासाठी वेगळी वेबसाईट आणि अॅप लाँच करणार असून, त्यावर नोंदणी करुन हा पास मिळवण्याची संधी खासगी वाहनधारकांना असेल.
हा पास कोणत्या टोलवर काम करेल?
खासगी वाहनाने जर तुम्ही राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करत असाल तर या वार्षिक पासचा उपयोग होणार आहे. मात्र राज्य रस्ते वाहतूक प्राधिकरणाने तयार केलेल्या मार्गांवर मात्र याचा लाभ घेता येणार नाही. यात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, समृद्धी महामार्ग, अटल सेतू यासारख्या रस्त्यांवर हा पास वापरता येणार नाही. मात्र मुंबई-दिल्ली, मुंबई कोलकाता, मुंबई चेन्नई या मार्गांवर याचा वारत करता येईल.
वार्षिक पास करण्याचं नियोजन कशासाठी?
राष्ट्रीय महामार्गांवर टोल भरण्यासाठी मोठ्या रांगा होतात. त्या कमी व्हाव्यात, हा या मागचा मुख्य उद्देश आहे. प्रवाशांना डिजिटल पेमेंटची सवय लागावी हाही यामागचा उद्देश आहे. टोल वसूल करणारे आणि चालकांमधील वाद यामुळे संपुष्टात येणार आहेत. 60 किमी अंतरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा उद्देशगी यामागे आहे. वार्षिक पास असल्यानं त्यांना आतासातत्यानं टोल भरावा लागणार नाही. महामार्गावरील प्रवास सुलभ व्हावा, यासाठी हा नवा पास उपयुक्त ठरणार आहे.